⚡सावंतवाडी ता.०९-: देशभक्तीची भावना जागृत करण्यासाठी सावंतवाडीत उद्या तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या तिरंगा यात्रेत सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब सहभागी होणार आहेत.
या यात्रेत शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आमदार दीपक केसरकर यांनी केले आहे. तिरंगा यात्रेच्या माध्यमातून राष्ट्रध्वजाबद्दलचा अभिमान आणि देशभक्तीची भावना अधिक दृढ करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
यात्रेत शिवसैनिकांसह नागरिकांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवून तिरंग्याचा सन्मान वाढवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
सावंतवाडीत उद्या तिरंगा यात्रा; केसरकर, संजू परब यांची उपस्थिती..
