वेंगुर्ला
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ रा प वेंगुर्ला आगारामार्फत अमावस्या वारी निमित्त मंगळवार दि. 11 आँगष्ट रोजी दुपारी 12 वा. वेंगुर्ला ते आदमापूर बाळूमामा दर्शनासाठी एस.टी. बस सोडण्यात येणार आहे. सदर बस वेंगुर्ला तुळस मार्गे सावंतवाडी, धवडकी, माडखोल, आंबोली, आजरा पिंपळगाव, गारगोटी मार्गे आदमापूर अशी जाणार आहे. 40 प्रवाशांचा गट किंवा विविध गावातून बाळूमामा चे भक्तगण जाण्यासाठी तात्काळ वेंगुर्ला आगार व्यवस्थापकांशी संपर्क साधून 40 जणांची नोंदणी झाल्यास थेट बाळूमामा दर्शन अशी बस सोडण्यात येणार आहे. तसेच हि बस वस्तीला राहून तेथूनच पुन्हा बाळूमामा भक्तांना वेंगुर्ला येथे घेऊन येईल. महिला व 65 वर्षावरील व्यक्तींना अर्धे तिकीट तर 75 वर्षे पुर्ण झालेल्यांना मोफत प्रवास मिळणार आहे. त्यामुळे केवळ बाळूमामा दर्शन अशी प्रवासी यात्रा होण्यासाठी बस मधील 40 सीटचे बुकींग (75 वर्षावरील जेष्ठ नागरिकांसह) झाल्यास वेंगुर्ला ते बाळूमामा दर्शन अशी प्रवासी बस सोडली जाईल. व बाळूमामाचे दर्शन सोहळ्यानंतर तिथून पुन्हा सर्व प्रवाश्यांना बस ने माघारी येता येणार आहे. बाळूमामा दर्शनासाठी भाविक वा भक्तगणांतून आपापल्या गावातून जाणाऱ्या 40 भक्तगणांना एकत्र करुन त्याची नोंदणी म्हणजे बुकींग वेंगुर्ले आगार व्यवस्थापक नवज्योत गावडे यांच्याकडे केल्यास त्याप्रमाणे बाळूमामा दर्शन यात्रा बस 40 प्रवासी बुकींग करणाऱ्या गावातून सोडण्यात येणार आहेत. बाळूमामा दर्शनास जाणाऱ्या भाविकांनी वेंगुर्ले आगारातर्फे खास बस सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये महिलांना, 65 वर्षे वयावरील नागरिकांना हाफ तिकीट तर 75 वर्षे पुर्ण झालेल्या नागरिकांना मोफत प्रवास या संधीचा लाभ मिळणार आहे. जास्तीत जास्त भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन वेंगुर्ला आगार व्यवस्थापक नवज्योत गावडे यांनी केले आहे.
वेंगुर्ला एस. टी. आगारातून बाळूमामा दर्शना साठी 11 ऑगस्ट रोजी बसफेरी
