वेंगुर्ला
वेंगुर्ला तालुक्यातील रेडी म्हारतळेवाडी येथील रहिवासी अनिल कृष्णा परुळेकर ( वय 58 , रा. कळवा) यांनी घराचे बांधकाम बाबत आर्थिक फसवणूक केल्याबाबत वेंगुर्ला पोलीस स्थानकात फिर्याद दिली होती. त्यानुसार गुन्हा दाखल झाल्यानंतर
वेंगुर्ला पोलीस उपनिरीक्षक शेखर दाभोलकर यांच्यासह वेंगुर्ला पोलीस पथकाने
संदीप धर्माजी मांजरेकर (वय 47, रा. न्हावेली ता. सावंतवाडी), सदगुरू काशिनाथ दळवी (वय 40, रा. होडावडा ता. वेंगुर्ला ) यांना अटक करीत एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती. संशयित दोघांना आज वेंगुर्ला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने संबंधित दोघांची जामीनावर मुक्तता केली आहे, याबाबतची माहिती वेंगुर्ला पोलिसांकडून देण्यात आली. तर दुसऱ्या संशयिताकडुन एक लाख रुपये रिकव्हरी करण्यात आली आहे. अनिल कृष्णा परुळेकर (रा. रेडी) यांनी, संदीप धर्माजी मांजरेकर (वय 47, रा. न्हावेली ता. सावंतवाडी), सदगुरू काशिनाथ दळवी (वय 40, रा. होडावडा ता. वेंगुर्ला व सुमित कोचरेकर (रा. न्हावेली ता. सावंतवाडी) यांच्याविरोधात 5 ऑगस्ट रोजी फिर्याद दिली होती. यात नमूद करण्यात आले होते की, संदिप मांजरेकर यांनी घराचे सर्व काम 11 लाख रुपये मध्ये करून देतो, असे सांगून वेळोवेळी एकूण 10,90,000 रुपये घेऊन केवळ 4,30,000 रुपये चे बांधकाम करून 6,60,000 रुपयाची फसवणूक केली आहे. तसेच
सुमित कोचरेकर याने प्लास्टर करिता 50,000 रुपये घेऊन ते न करता त्यांनी आपापसात संगनमत करून घराचे काम ठरलेल्या मुदतीत पूर्ण न करता अर्धवट टाकून एकूण 7,10,000 ची फसवणूक केलेली आहे. तसेच संदिप मांजरेकर व सदगुरू दळवी
यांनी मिळून जुन्या घराचे 30 पत्रे व 22 लोखंडी चॅनल तसेच तेथे असलेले 100 नारळ कोणतीही कल्पना न देता त्यांच्या परवानगीशिवाय नेले आहे, असे फिर्यादित म्हटले होते. याप्रकरणी संशयित संदीप मांजरेकर व
सदगुरू दळवी या दोघांना
पोलीस उपनिरीक्षक शेखर दाभोलकर, पोलिस अंमलदार मंगेश जाधव, रामचंद्र माळगावकर, गजानन देसाई यांनी शुक्रवारी शिताफीने अटक करून शनिवारी न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. तर सुमित कोचरेकर यांच्याकडून 50 हजार रक्कम रिकव्हरी करण्यात आली होती.
ही घटना दि.29 मार्च 2026 रोजी ते 26 मे 2026 रोजी या मुदतीत घडली होती.
याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक शेखर दाभोलकर यांच्या जलद कारवाई कामगिरीबाबत कौतुक होत आहे.
रेडी येथील घरबांधकाम फसवणूकप्रकरणी दोघांची जामीनावर मुक्तता
