मालवण दि प्रतिनिधी
जयवंती बाबू फाउंडेशन संचलित एमआयटीएम इंजिनिअरिंग कॉलेज, सुकळवाडचे विश्वस्त विनोद बाबू कदम ( वय सुमारे ६५) यांचे आज पहाटेच्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांचे पार्थिव मुंबई येथील त्यांच्या निवास स्थानी नेण्यात आले असून त्याच ठिकाणी सोमवारी सकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
विनोद कदम हे मुंबई मंत्रालयात नोकरीला होते. सिंधुदुर्गातील विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंगचे शिक्षण सुलभ होण्यासाठी त्यांनी वडिलांच्या नावाने जयवंती बाबू फाउंडेशनची स्थापना करुन सुकळवाड येथे एमआयटीएम इंजिनिअरिंग कॉलेज सुरु केले. या संस्थेवर ते विश्वस्त म्हणून कार्यरत होते. मध्यरात्रीच्या सुमारास अल्पशा आजाराने त्यांचे निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून, जावई असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे.
