Headlines

लायन्स क्लब मालवणतर्फे कुंभारमाठ कातकरी वस्तीत अन्नदान व वस्त्रदान

जागतिक आदिवासी दिननिमित्त लायन्स क्लब ऑफ मालवण व पाटीदार युवा मंडळाचा सेवाभावी उपक्रम

मालवण (प्रतिनिधी)

जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून लायन्स क्लब ऑफ मालवण व पाटीदार युवा मंडळ मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने कुंभारमाठ येथील कातकरी वस्तीमध्ये अन्नदान व वस्त्रदानाचा सामाजिक उपक्रम उत्स्फूर्तपणे राबविण्यात आला. या उपक्रमातून केवळ मदतीचा हातच नव्हे, तर माणुसकी, सामाजिक बांधिलकी आणि आपुलकीची भावना जपण्याचा संदेश सेवाकार्यातून दिसून आला.

लायन्स क्लब ऑफ मालवण आणि पाटीदार युवा मंडळाने कातकरी वस्तीमध्ये प्रत्यक्ष जाऊन अन्नदान व वस्त्रदान केले. यावेळी दोन्ही संस्थांच्या पदाधिकारी व सदस्यांनी कातकरी बांधवांशी मनमोकळेपणाने संवाद साधला. त्यांच्या दैनंदिन जीवनातील अडचणी, गरजा आणि समस्या जाणून घेत त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होण्याचा प्रयत्न करण्यात आला. कातकरी कुटुंबांच्या चेहऱ्यावर उमटलेले समाधानाचे भाव आनंददायी ठरले.

या सेवाकार्यात लायन्स क्लब ऑफ मालवण अध्यक्ष सहदेव बापर्डेकर, सचिव पुनम चव्हाण, उपाध्यक्ष मनाली दळवी, मीना घुर्ये, फॅनी फर्नांडिस, राजा शंकरदास, विश्वास गांवकर, लायन्स क्लब सदस्य तसेच पाटीदार युवा मंडळाचे इमिजंट पास्ट प्रेसिडेंट शांती पटेल, प्रेसिडेंट सत्यम पटेल, सेक्रेटरी रोहित पटेल, खजिनची सार्थक पटेल, तसेच लक्ष्मी लुडबे आणि कातकरी वस्तीतील कुटुंबीय उपस्थित होते.

लायन्स क्लब ऑफ मालवणचे अध्यक्ष सहदेव बापर्डेकर व पदाधिकारी यांनी यावेळी सेवाभावी उपक्रमांमधून समाजातील गरजू घटकांशी नाते जोडण्याचे महत्त्व अधोरेखित केले. तर पाटीदार युवा मंडळ पदाधिकाऱ्यांनीही सामाजिक बांधिलकी जपत अशा उपक्रमांमध्ये सातत्याने सहभागी होण्याचा निर्धार व्यक्त केला.

You cannot copy content of this page