सावंतवाडी – 20
रोटरी क्लब, इनरव्हील क्लब, रोटराॕक्ट क्लब, सावंतवाडी, रोटरी क्लब, बांदा,आणि सावंतवाडी तील युवा रक्तदाता संघटना, मुस्लिम हेल्थ अॕन्ड वेलफेअर फाउंडेशन, सार्वजनिक गणेश उत्सव, चितार आळी आणि सावंतवाडी नगरपरिषद तसेच सावंतवाडी तालुका पत्रकार संघ सावंतवाडी या सर्व संस्थांनी सहभागातुन आणि व्हीजन आरएस लॕब प्रा.ली.मुंबई यांंच्या सहयोगाने घेतलेल्या “नेत्र-शिबिराचे” चष्मे आज रोजी कोलकत्ता येथून प्राप्त झाले आहेत. सदर चष्माचे वितरण रविवार दि.२५ सप्टेंबर २२ रोजी रोटरी क्लब आॕफ सावंतवाडी चॕरिटेबल ट्रस्ट, साधले मेस समोर सकाळी 9.30 ते 2.00 या काळात करण्यात येणार आहे.
तरी ज्यानी या नेत्र-शिबिरात सहभाग घेतला होता आणि ज्याना चष्मा लागला आहे त्यानी आपला चष्मा त्यावेळी दिलेली स्लीप दाखवून घेऊन जावा असे आवाहन 2021-22 चे अध्यक्ष रो.साईप्रसाद हवालदार व 22-,23 अध्यक्ष रो. विनया बाड यानी केले आहे. संपर्क – रोट.मिहिर ९४२२०७८६९४,रो. साई -९४२२०५४७३७
