आरोस परिवर्तन मंडळाकडून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

⚡बांदा ता.२०-: आरोस गावातील 25 कुटुंबांना श्री देवी माऊली मंदिर येथे आरोस परिवर्तन युवक मंडळाच्या पुढाकाराने जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाचे औचित्य साधून आरोस गावचे सुपुत्र लेखक व कवी दिपक पटेकर यांचा सत्कार करण्यात आला. प्रमुख मान्यवर म्हणून ग्रामपंचायत सदस्या मनीषा परब, लेखक व कवी दीपक पटेकर, ज्येष्ठ नागरिक शरद परब, पोलीस पाटील महेश आरोसकर, तसेच चंद्रकांत घोगळे, अमर घोगळे व गावातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन आरोस परिवर्तन युवक मंडळाचे सदस्य बाळा परब, मंदार नाईक, महेश परब, निलेश देऊलकर,आनंद परब, नंदू परब निखिल नाईक, अक्षय नाईक, संदेश देऊलकर यांनी केले.

मंडळाच्या वतीने बोलताना निखिल नाईक म्हणाले की, आपण सगळे जण आपल्या गावचे देणे लागतो. या भावनेतुन श्री देव गिरोबा, देवी माऊली आणि रवळनाथाच्या आशीर्वादाने आरोस परिवर्तन युवक मंडळाच्यावतीने सदर कार्यक्रम आयोजित केला. यापुढेही आरोस गावातील विद्यार्थ्यांसाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी, महिलांसाठी तसेच कलाकारांसाठी विविध उपक्रमांच्या माध्यमातून नेहमीच कार्यरत राहील.
निलेश देऊलकर यांनीही आपले मत व्यक्त करून सर्व उपस्थितांचे आभार मानले.

You cannot copy content of this page