मालवण : (प्रतिनिधी)
मालवण राजकोट येथे राजकोट बॉईज आणि राजकोट मित्रमंडळाच्या वतीने आयोजित आणि बांधकाम सभापती सहदेव बापार्डेकर व युवा उद्योजक सोनू खांदारे पुरस्कृत भव्य स्वरूपात आयोजित करण्यात आलेल्या महिला व पुरुष गटातील नारळ लढवणे स्पर्धेला महिला व पुरुष स्पर्धेकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या स्पर्धेत महिला गटात सौ. अक्षता आचरेकर विजेत्या ठरल्या तर पुरुष गटात पंकज सादये हे विजेते ठरले.
या स्पर्धेचे उद्घाटन शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत व महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन सदस्य तथा युवासेना नेत्या अपूर्वा किरण सामंत यांच्या हस्ते, शिवसेना उपनेते संजय आंग्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत राजकोट किल्ला येथे झाले. यावेळी संजय आंग्रे, दत्ता सामंत व अपूर्वा सामंत यांनी स्पर्धेच्या भव्य आयोजनाचे तसेच राजकोट बॉईज व राजकोट मित्रमंडळाच्या आयोजकांचे विशेष कौतुक केले. आमदार निलेश राणे, आमदार किरण सामंत यांच्याही सामाजिक कार्याचा या स्पर्धेच्या निमित्ताने विशेष गौरव करण्यात आला.
या स्पर्धेत महिला गटात महिला गटात अक्षता आचरेकर विजेत्या ठरल्या तर संजना मेस्त्री द्वितीय तर धनश्री लाड या तृतीय क्रमांकाच्या मानकरी ठरल्या. प्रथम क्रमांकाच्या विजेत्यास सोन्याची नथ, मिक्सर व मानाची पैठणी, द्वितीय क्रमांकासाठी फ्रीज व पैठणी, तर तृतीय क्रमांकासाठी वॉशिंग मशीन व पैठणी अशी बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.
या स्पर्धेत पुरुषांसाठी आयोजित खेळी नारळ फोडणे स्पर्धेत पंकज सादये विजेते तर दीप केरकर उपविजेते ठरले. तसेच अनिकेत जांभळे तृतीय, रुद्र राऊळ चतुर्थ क्रमांकाचे पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. विजेत्यास ५५ हजार ५५५ रुपये व आकर्षक चषक, द्वितीय क्रमांकास २५ हजार ५५५ रुपये व आकर्षक चषक, तर तृतीय व चतुर्थ क्रमांकाच्या विजेत्यांना प्रत्येकी ५ हजार ५५५ रुपये व आकर्षक चषक देऊन सन्मानित करण्यात आले. याशिवाय अन्य विविध आकर्षक बक्षिसांचा वर्षाव विजेत्यांवर करण्यात आला.
या स्पर्धेस उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर, युवा उद्योजक सोनू खांदारे, सुनील खांदारे, माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण, शिवसेना तालुकाप्रमुख मंदार लुडबे, युवासेना जिल्हाप्रमुख संग्राम साळसकर, शहर संघटक राजू बिडये, सोशल मीडिया प्रमुख किसन मांजरेकर, ऋत्विक सामंत, बबन रेडकर, नंदू देसाई, अक्षय मालवणकर, नागेश परब, महिला व बालकल्याण सभापती अन्वेषा आचरेकर, उपसभापती अश्विनी कांदळकर, गीता बापर्डेकर, गौरी खांदारे, रूपा बिडये, अनिता फर्नांडिस, मंदा जोशी नगरसेविका महानंदा खानोलकर, विजू कांदळकर, जॉन नरोना, परशुराम पाटकर, यश कवठकर, दीपक कुडाळकर, राजापूर जि.प. सदस्य प्रकाश पोळेकर, प्रतीक मठकर, पं.स. सदस्य अविनाश पराडकर, सुभाष गुरव, अजित नारकर, भरत लाड, जितेंद्र खांबकर, संदीप बारसकर, सुरेश येनारकर, प्रसाद गुरव, सुभाष बापारकर, शाम वाक्कर यांच्यासह अन्य पदाधिकारी, राजकोट बॉईज व राजकोट मित्रमंडळाचे सदस्य उपस्थित होते. यावेळी महिला भगिनींची लक्षणीय उपस्थिती होती.
