Headlines

मालवण भरड भागातील वाहनतळ दिवाळीपूर्वी सुरू करावे

व्यापाऱ्यांची मुख्याधिकाऱ्यांकडे मागणी ⚡मालवण ता.१२-: पर्यटन शहर असलेल्या मालवण मधील वाहन पार्किंगची समस्या सोडविण्याच्या दृष्टीने मालवण नगरपालिकेच्या वतीने भरड येथे वाहनतळ उभारण्यात येत असून या वाहनतळाचे बहुतांशी काम पूर्ण झाले आहे. येत्या काही दिवसात येणारा दिवाळी सण आणि त्या पाठोपाठ येणारा पर्यटन हंगाम याचा विचार करून पार्किंगची व्यवस्था होण्याच्या दृष्टीने दिवाळी पूर्वी हे वाहनतळ सुरु…

Read More

विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबर अवांतर वाचनाची कास धरून आपली प्रगती साधावी

मालवणी कवी श्री. रुजारीओ पिंटो यांचे प्रतिपादन ⚡मालवण ता.१२-: मानवी जीवनाच्या जडणघडणीत वाचनाला अनन्यसाधारण महत्व असून वाचनाने माणूस हा घडत असतो म्हणून विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबर अवांतर वाचनाची कास धरून आपली प्रगती साधावी असे प्रतिपादन कोमसापचे जिल्हा उपाध्यक्ष आणि मालवणी कवी श्री. रुजारीओ पिंटो यांनी येथे बोलताना केले. भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा १५…

Read More

खासदार विनायक राऊत उद्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर…

⚡सिंधुदुर्ग दि.१२-: रत्नागिरी- सिंधुदुर्ग जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार लोकसभा शिवसेना गटनेते, शिवसेना सचिव विनायक राऊत हे उद्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा नियोजित दौरा पुढीलप्रमाणे आहे. गुरुवार दिनांक १३ ऑक्टोबर २०२२ सकाळी ११.०० वाजता – कुडाळ नगरपंचायत येथे नवीन अग्निशमन वाहनाचा लोकार्पण सोहळयास उपस्थिती. दुपारी १.०० वाजता – 1. ओरोस शासकीय विश्रामगृह येथे कुडाळ नगर…

Read More

विजेचा शॉक लागून वेंगुर्ले-कोचरे येथे परप्रांतीय कामगार ठार…

⚡वेंगुर्ले ता. १२: विजेच्या तारेचा शॉक लागून कोचरे-आगारवाडी येथे एका परप्रांतीय कामगाराचा मृत्यू झाला. ही घटना काल रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास घडली. लोकनाथ चित्तरंजन सरकार उर्फ छोटू (वय २४), असे त्या कामगाराचे नाव आहे. कोळंबी प्रकल्पाचे नुकसान करणाऱ्या पाण मांजरांना रोखण्यासाठी विद्युत भारीत तारा लावण्यात आल्या होत्या. त्या तारांचा स्पर्श झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला, असा…

Read More

पक्षीय मतभेद बाजूला ठेवून ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यकारणीला सहकार्य करावे…

दादा कुबल; आसोली ग्रामपंचायतीच्या नूतन इमारतीचे मोठ्या दिमाखात उद्घाटन… ⚡वेंगुर्ले ता. ११: गावच्या विकासासाठी ग्रामस्थांनी पक्षीय मतभेद बाजूला ठेवून एकत्र आले पाहिजे. त्यासाठी ग्रामपंचायत कार्यकारणीला सर्वतोपरी सहकार्य केले पाहिजे, असे आवाहन जिल्हा परिषद माजी शिक्षण व आरोग्य सभापती दादा कुबल यांनी आज येथे केले. दरम्यान माझ्या राजकीय यशात आसोलीतील ग्रामस्थांचे मोलाचे योगदान आहे. अनेक निवडणुकीत…

Read More

संजू परब यांची सायंकाळची पत्रकार परिषद रद्द

दोन दिवसांनी घेणार असल्याचे केले जाहीर ⚡सावंतवाडी ता.१२-: संजू परब यांनी आज सायंकाळी पाच वाजता पत्रकार परिषद आयोजित केली होती. परंतु विशाल परब यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमानिमित्त ही पत्रकार परिषद आता रद्द करण्यात आली आहे. काल आमदार दीपक केसरकर यांनी आगामी स्थानिक निवडणुका युतीमध्ये लढणार असल्याचे सांगितले होते. “त्या” विषयावर परब आज पत्रकार परिषदेत बोलणार होते….

Read More

एक्साईजच्या आश्वासनांती मनसेचे बांद्यातील आंदोलन स्थगित

जानेवारीपासून आतापर्यंत तब्बल 48 गुन्हे दाखल तर 34 वाहनासह 3 कोटी 28 लाखाचा मुद्देमाल जप्त ⚡बांदा ता.१२-: गोवा राज्यातून महाराष्ट्रात अवैधरित्या होणाऱ्या गोवा बनावटीच्या दारूची चोरटी वाहतूक रोखण्यासाठी तसेच याकडे लक्ष वेधण्यासाठी मनसेच्या वतीने पुकारलेले डब्बे वाजवा आंदोलन अखेर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या लेखी कारवाईच्या पत्रानंतर मागे घेण्यात आले आहे गोवा बनावटीच्या दारूचा छुप्या मार्गाने…

Read More

ओसरगावमध्ये फार्म हाऊसमध्ये घुसला अजगर

बबली राणे यांच्या कर्तव्यदक्षतेने वाचला कोंबड्यांचा जीव ⚡कणकवली ता.१२-: सामाजिक कार्यकर्ते आणि ओसरगावचे माजी उपसरपंच बबली राणे यांनी पुन्हा एकदा कर्तव्यदक्षतेने मुक्या प्राण्यांचा जीव वाचवला आहे. ओसरगाव येथील श्याम सावंत यांच्या फार्म हाऊसमध्ये एक अजस्त्र अजगर शिरला होता. हा अजगर तेथील कामगारांना आढळताच त्यांनी श्याम सावंत यांना फोनद्वारे कळविले. सावंत यांच्या कानावर ही बातमी पडताच…

Read More

अखेर एसटीच्या सिंधुदुर्ग विभागीय कर्मचाऱ्यांचे पगाराचा प्रश्न निकाली

13 ऑक्टोबरचे आंदोलन स्थगित ⚡कणकवली ता.१२-: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून सिंधुदुर्ग विभागीय कार्यालयात कार्यरत कर्मचारी यांचे माहे सप्टेंबर २०२२ चे मासिक वेतन विहीत तारखेपर्यंत प्राप्त न झालेले नाही सदर वेतन 12 ऑक्टोबर पर्यंत प्राप्त न झाल्यास 13 ऑक्टोबर पासून कोणत्याही क्षणी आंदोलना सारख्या मार्गाचा अवलंब करावा लागेल असा इशारा राज्य परिवहन महामंडळाच्या सिंधुदुर्ग विभागातील…

Read More

भाजपा युवा नेते विशाल परब याना वाढदिवसाच्या पश्चिम महाराष्ट्रातूनही शुभेच्छा

⚡सावंतवाडी ता.१२-: पश्चिम महाराष्ट्रात घाटमाथ्यावर भाजपचे युवा नेते विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या चाहत्यांकडून शुभेच्या देण्यात येत असून, सांगली, सातारा, कराड, पंढरपूर येथे चाहत्यांकडून त्यांचे जंगी स्वागत करत शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी भाजपचे युवा नेते विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यात 15 ऑक्टोंबर रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, बाळासाहेबांची शिवसेना गटाचे आमदार शहाजी…

Read More
You cannot copy content of this page