शुक्रवारी सायंकाळी पालखी मिरवणूक,दहिकालाने होणार सप्ताहाची सांगता
वेंगुर्ला
वेंगुर्ला तालुक्यातील शिरोडा श्री देवी माऊली पंचायतन देवस्थान, शिरोडा चा वार्षिक
भजनी सप्ताह शुक्रवार दि. २१ ऑगस्ट ते शुक्रवार 28 ऑगस्ट या कालावधीत संपन्न होत आहे. आज गुरुवारी
रात्री श्री देवी माऊली पंचायतन देवस्थान शिरोडा गजर माऊलीचा सोहळा आंनदाचा अखंड हरीनाम सप्ताह येथे वारकरी दिंडी उत्साहात साजरी झाली. रामपुरुष मंदिर पासून शिरोडा माऊली मंदिर पर्यंत दिंडी काढण्यात आली. वारकरी पद्धतीने जुनी परंपरा अजूनही कोकणात दिसते. अनेक प्रकारची सोंग नटली जातात. ज्ञानोबा तुकाराम च्या गजर म्हणत दिंडी वारकरी मंडळी माऊली मंदिरापर्यंत भाविकांच्या उपस्थितीत आनंदी व मंगलमय वातावरणात संपन्न झाली. उद्या शुक्रवारी
२८ ऑगस्ट रोजी सायंकाळी पालखी मिरवणूक, त्यानंतर दहिकाला होऊन सप्ताहाची सांगता होणार आहे. भाविकांनी धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन विश्वस्त
श्री देवी माऊली पंचायतन देवस्थान, शिरोडा यांच्यामार्फत करण्यात आले आहे.
