Headlines

कोकण रेल्वे स्थानकांवरील एक्सप्रेस थांब्यासाठी आमदार प्रमोद जठारांची रेल्वे च्या COM यांच्याशी महत्त्वपूर्ण चर्चा…

राजापूर, विलवडे, संगमेश्वर व वैभववाडी स्थानकांच्या विविध समस्यांवर चर्चा..

⚡वैभववाडी ता.०२-: कोकणातील राजापूर, विलवडे, संगमेश्वर आणि वैभववाडी रेल्वे स्थानकांवर एक्सप्रेस गाड्यांना थांबा मिळावा, तसेच प्रवाशांच्या विविध प्रलंबित समस्या सोडवाव्यात, यासाठी आमदार प्रमोद जठार यांनी कोकण रेल्वेच्या मुख्य परिचालन व्यवस्थापकांची (COM) भेट घेतली.

यावेळी संबंधित स्थानकांवर एक्सप्रेस गाड्यांचे थांबे, प्रवाशांना आवश्यक सुविधा तसेच स्थानकांशी संबंधित विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. कोकणातील प्रवाशांच्या दैनंदिन गरजा लक्षात घेऊन रेल्वे या मागण्यांवर सकारात्मक कार्यवाही करावी, अशी भूमिका आमदार प्रमोद जठार यांनी मांडली.

प्रवाशांच्या सोयीसाठी आवश्यक पाठपुरावा पुढेही सुरू ठेवण्याचे आश्वासन यावेळी दिले.

You cannot copy content of this page