Headlines

कणकवली तालुक्यात जलतारा व शोषखड्डा मोहिमेला प्रारंभ…

सर्व ग्रामपंचायतींनी उद्दिष्टपूर्ती करावी; सभापती हर्षदा वाळके..

⚡कणकवली ता.०२-: तालुक्यात जलतारा व शोषखड्डा मोहिमेचा शुभारंभ तालुक्याच्या सभापती हर्षदा वाळके यांच्या हस्ते करण्यात आला. नांदगाव ग्रामपंचायतीच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या शोषखड्डा व जलतारा कामांचा शुभारंभ यावेळी करण्यात आला.

या मोहिमेच्या माध्यमातून पावसाचे पाणी जमिनीत जिरवून भूजल पातळी वाढविणे आणि जलसंधारणाला चालना देणे हा उद्देश आहे. कणकवली तालुक्यातील सर्वच ग्रामपंचायतींनी जलतारा व शोषखड्ड्यांची कामे सातत्याने हाती घेऊन निर्धारित उद्दिष्ट पूर्ण करावे, असे आवाहन सभापती हर्षदा वाळके व उपसभापती सोनू सावंत यांनी यावेळी केले.

यावेळी गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, सरपंच रविराज मोरोजकर, ग्रामविकास अधिकारी, तांत्रिक सहाय्यक, लाभार्थी तसेच ग्रामरोजगार सहाय्यक आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page