एक्साईजच्या आश्वासनांती मनसेचे बांद्यातील आंदोलन स्थगित

जानेवारीपासून आतापर्यंत तब्बल 48 गुन्हे दाखल तर 34 वाहनासह 3 कोटी 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

⚡बांदा ता.१२-: गोवा राज्यातून महाराष्ट्रात अवैधरित्या होणाऱ्या गोवा बनावटीच्या दारूची चोरटी वाहतूक रोखण्यासाठी तसेच याकडे लक्ष वेधण्यासाठी मनसेच्या वतीने पुकारलेले डब्बे वाजवा आंदोलन अखेर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या लेखी कारवाईच्या पत्रानंतर मागे घेण्यात आले आहे

गोवा बनावटीच्या दारूचा छुप्या मार्गाने महाराष्ट्रत सुळसुळाट सुरूच आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात 3 चेक पोस्ट असून देखील यावर हवा तसा आळा बसलेला नाही एखाद्यावेळी कारवाई केली जाते यामुळे त्यांना जाग आणून देण्यासाठी इन्सुलि चेक पोस्ट वर मनसेच्या वतीने आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता आज मनसे पदाधिकारी आंदोलन छेडण्यासाठी बांदा येथे गेले असता राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून अवैध चोरट्या वाहतूकीवर कारवाई सुरू असल्याचे पत्र आंदोलनकर्त्यांना देण्यात आले यामुळे मनसेने पुकारलेले आंदोलन स्थगित करण्यात आले.

You cannot copy content of this page