Headlines

कणकवली तालुका भारतीय जनता पार्टी आयोजित सार्वजनिक नवरात्रोत्सवाला विविध कार्यक्रमांचे आयोजन…

⚡कणकवली ता.११-: कणकवली तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने सार्वजनिक नवरात्रोत्सव २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, ११ ऑक्टोबर ते बुधवार, २१ ऑक्टोबर या कालावधीत विविध धार्मिक विधी, भजन, दशावतारी नाट्यप्रयोग आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी नागरिकांना अनुभवता येणार आहे. कोकणातील पारंपरिक दशावतारी लोककलेला विशेष महत्त्व देत विविध नामांकित दशावतारी नाट्यमंडळांचे प्रयोग आयोजित करण्यात आले आहेत. रविवार, ११ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता श्री. देवी पटकीदेवी बाजारपेठ मार्गे देवीचे आगमन, त्यानंतर सकाळी १० वाजता प्राणप्रतिष्ठापना व महाआरती, रात्री ८ वाजता देवेंद्र नाईक प्रस्तुत चेंदवनकर दशावतार नाट्य मंडळ चेंदवन ट्रिकसिन युक्त दशावतारी नाट्य प्रयोग ‘अघोरी मयाजाल’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे. सोमवार, १२ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजता कुंकूमार्जन पूजा, दुपारी ३ वाजता संगीत भजने आणि रात्री ८ वाजता श्री. हेरंब दशावतार नाट्यमंडळ वायंगणी यांचा चंडीस्वरूपीणी सीता हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे. मंगळवारी १३ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजता कुंकूमार्जन पूजा, सकाळी १० वाजता श्री सत्यनारायण महापूजा दुपारी १२ वाजता तीर्थप्रसाद व महाप्रसाद दुपारी ३ वा. नंतर सुस्वर संगीत भजने व रात्री८ वाजता डबलबारी भजनाचा जंगी सामना ( बुवा श्री. राजेंद्र घाडीगावकर व श्री. केदार कमलाकर कदम) बुधवारी १४ ऑक्टोबर रोजी, सकाळी ८ वाजता कुंकूमार्जन पूजा, दुपारी ३ नंतर सुस्वर संगीत भजने व रात्री ८ वाजता कै. लोकराजा सुधीर कलिंगण प्रस्तुत कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ नेरूर यांचा ट्रिक्सिनयुक्त दशावतारी नाट्य प्रयोग एकपदा पृथ्वीकंकण हा नाट्यप्रयोग होणार आहे. १५ ऑक्टोबर रोजी, सकाळी ८ वाजता कुंकू मार्जन पूजा, दुपारी ३ वाजता संगीत भजने, रात्री ८ वाजता शरद मोर्चमाडकर प्रस्तुत जय हनुमान दशावतार नाट्य मंडळ आरोस – दांडेली यांचा दशावतारी नाट्यप्रयोग रक्तवर्णा हरीतांबिका हा नाट्यप्रयोग होणार आहे. १६ ऑक्टोबर रोजी, सकाळी ८ वाजता कुंकू मार्जन पूजा, दुपारी ३ वाजता सुस्वर संगीत भजने, रात्री ८ वाजता कै. शंकर मोरे प्रस्तुत मोरेश्वर दशावतार नाट्यमंडळ मोरे यांचा पराशक्ती धुमावती हा नाट्यप्रयोग होणार आहे. १७ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजता कुंकुमार्जन पूजा, दुपारी ३ वाजता संगीत भजने, रात्री ८ वाजता एम.जे डान्स अकॅडमी सावंतवाडी प्रस्तुत आर.डी.एक्स क्यू सावंतवाडी द ग्रँड नवरात्री स्पेशल शो होणार आहे. १८ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजता कुंकुमार्जन पूजा, दुपारी ३ वाजता सुस्वर संगीत भजने, रात्री ८ वाजता कै. बाबी कलिंगण प्रस्तुत कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ नेरुळ यांचा देवी भद्रकला हा नाट्यप्रयोग होणार आहे. १९ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजता कुंकुमार्जन पूजा, दुपारी ३ वाजता सुस्वर संगीत भजने, रात्री ८ वाजता पारसेकर दशावतार नाट्य मंडळ वेंगुर्ला यांचा विधिलिकित हा दशावतार नाट्यप्रयोग होणार आहे. २० ऑक्टोबर रोजी सकाळी८ वाजता कुंकुमार्जन पूजा, रात्री ८ वाजता डबलबारी भजनाचा जंगी सामना ( बुवा श्री. विनोद चव्हाण व श्री. गुंडू सावंत ), २१ ऑक्टोबर रोजी देवीची विसर्जन मिरवणूक निघणार आहे.

You cannot copy content of this page