वेंगुर्ला
वेंगुर्ला बंदर येथे आज गुरुवारी २७ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध नारळी पौर्णिमा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मच्छिमार बांधव, नागरिक,
नगराध्यक्ष, तहसीलदार, पोलीस निरीक्षक, पत्रकार, विविध संस्था, लोकप्रतिनिधी, व्यापारी यांनी वेंगुर्ला बंदर येथे समुद्राला नारळ अर्पण केला. बोटमालक मच्छिमार यांच्यामार्फत पूजन करून समुद्रास नारळ अर्पण करण्यात आला. या नारळीपौर्णिमे निमित्त सर्वप्रथम वेंगुर्ला नायब तहसीलदार राजन गवस यांनी समुद्राला नारळ अर्पण केला. यानंतर वेंगुर्ला नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप, पो. नि. निसर्ग ओतारी, वेंगुर्ला पं. स. सभापती शंकर घारे, वेंगुर्ला तालुका पत्रकार समिती अध्यक्ष दिपेश परब यांच्यावतीने समुद्राला नारळ अर्पण करण्यात आले.प्रमुख मच्छिमार यांच्यामार्फत नारळ पूजन करून समुद्रास नारळ अर्पण करण्यात आला. यावेळी मच्छीमार बाबी रेडकर, गणपत चोडणकर, मोजेस फर्नांडिस, प्रदीप सागवेकर, मोहन सागवेकर, ज्ञानेश्वर सागवेकर, वसंत तांडेल, दादा केळुसकर, उमेश केळुसकर, प्रशांत लोणे, कपिल पटनाईक, भूषण फर्नांडिस, दाजी खोबरेकर आदी व अन्य मच्छिमार बांधव उपस्थित होते. सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनीही वेंगुर्ला येथे समुद्रास नारळ अर्पण केला. यावेळी याठिकाणी जिल्हा बँक संचालक महेश सारंग, भाजपा वेंगुर्ला तालुकाध्यक्ष विष्णु उर्फ पप्पू परब, भाजपा तालुका सरचिटणीस वसंत तांडेल, वेंगुर्ला तालुका खरेदी विक्री संघांचे चेअरमन ज्ञानेश्वर केळजी, शिरोडा माजी सरपंच मनोज उगवेकर, मयुरेश शिरोडकर, होडावडा उपसरपंच राजबा सावंत, शिरोडा माजी उपसरपंच राहुल गावडे, अमित गावडे, सायमन आल्मेडा, मारुती दोडशानट्टी, दाजी नाईक, भरत सातोसकर आदी उपस्थित होते. तसेच
नगरसेवक, नगरसेविका,
पो. कॉ. प्रथमेश पालकर, हर्षला परब, दिपाश्री मठकर व अन्य, वेंगुर्ल्यातील व्यापारी, नागरिक यांची मोठी उपस्थिती होती.
वेंगुर्ला बंदर येथे “नारळी पौर्णिमा” सण मोठ्या उत्साहात साजरा….
