विजेचा शॉक लागून वेंगुर्ले-कोचरे येथे परप्रांतीय कामगार ठार…

⚡वेंगुर्ले ता. १२: विजेच्या तारेचा शॉक लागून कोचरे-आगारवाडी येथे एका परप्रांतीय कामगाराचा मृत्यू झाला. ही घटना काल रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास घडली. लोकनाथ चित्तरंजन सरकार उर्फ छोटू (वय २४), असे त्या कामगाराचे नाव आहे. कोळंबी प्रकल्पाचे नुकसान करणाऱ्या पाण मांजरांना रोखण्यासाठी विद्युत भारीत तारा लावण्यात आल्या होत्या. त्या तारांचा स्पर्श झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. याबाबतची खबर होडावडा-पटेलवाडी येथील आत्माराम भिवा दळवी यांनी निवती पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आल्याची माहिती ठाणे अंमलदार सायमन डिसोजा यांनी दिली.

You cannot copy content of this page