Headlines

शिवसेनेतर्फे कुडाळात जिल्हास्तरीय नरकासुर वध स्पर्धा…

कुडाळ शहर मर्यादित गड किल्ले स्पर्धेचेही आयोजन :लाखो रुपयांची पारितोषिके..

⚡कुडाळ ता.११-: कुडाळ शहर शिवसेनेच्या वतीने कुडाळ येथे दिवाळी निमित्त सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय नरकासुर वध स्पर्धा आणि कुडाळ शहर मर्यादित गड किल्ले प्रतिकृती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहीती शिवसेना शहरप्रमुख तथा नगरसेवक अभिषेक गावडे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
कुडाळ येथे शहर शिवसेना आयोजित पत्रकार परिषदेत अभिषेक गावडे बोलत होते. यावेळी नगरसेवक विलास कुडाळकर, उपशहरप्रमुख चेतन पडते, आबा धडाम, प्रथमेश सावंत, प्रथमेश कांबळी, राजवीर पाटील आदी उपस्थित होते.
अभिषेक गावडे म्हणाले की, ७ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजता कुडाळ बसस्थानक जवळ जिल्हास्तरीय नरकासुर वध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. पर्यावरण पुरक हि स्पर्धा होणार आहे. जिल्ह्यातील युवक मंडळांनी यात सहभाग घ्यावा. या स्पर्धेसाठी प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकासाठी ५० हजार रू., ३० हजार रू. व १५ हजार रू. अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत.
७ ते १२ नोव्हेंबर या कालावधीत कुडाळ शहर मर्यादित गडकिल्ले प्रतिकृती स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेसाठी प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकासाठी अनुक्रमे १५ हजार रू., १० हजार रू. व तृतीय क्रमांक ५ हजार रूपये अशी रोख पारितोषिक देण्यात येणार आहेत. प्रवेश विनामूल्य असून, दोन्ही स्पर्धा नावनोंदणीसाठी उपशहरप्रमुख चेतन पडते व आबा धडाम यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन शहरप्रमुख अभिषेक गावडे यांनी केले आहे.

You cannot copy content of this page