⚡सावंतवाडी, ता. ११-: नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड (NAB), सिंधुदुर्ग, भटवाडी-सावंतवाडी यांच्या वतीने पांढरी काठी दिवस गुरुवार, १५ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता भटवाडी येथील NAB नेत्र रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावर साजरा करण्यात येणार आहे.

या निमित्ताने आयोजित स्नेहमेळाव्यास शहरातील प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमात गरजू दृष्टीबाधितांना पांढऱ्या काठ्यांचे वाटप करण्यात येणार असून, NABच्या दृष्टीबाधित लाभार्थ्यांना कार्यक्रमास ये-जा करण्यासाठीचा प्रवासखर्च देण्यात येणार आहे. तसेच उपस्थितांसाठी चहा-पाणी व भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.
यावेळी गरजू दृष्टीबाधितांची विनामूल्य नेत्र तपासणी करण्यात येणार आहे. त्यामुळे NABच्या सर्व लाभार्थ्यांनी तसेच दृष्टीबाधितांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन NABचे अध्यक्ष अनंत व्यंकटेश उचगावकर व सचिव सोमनाथ जिनी यांनी केले आहे.
