Headlines

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त मुलींच्या लंगडी स्पर्धेचे आयोजन…

⚡दोडामार्ग ता.२७-: शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडी संचलित दोडामार्ग इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज, दोडामार्ग येथे राष्ट्रीय क्रीडा दिन २०२६ निमित्त मुलींसाठी विशेष लंगडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. बँक ऑफ इंडिया, शाखा दोडामार्ग यांच्या पुरस्कर्तेपदातून तसेच शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडीचे अध्यक्ष व जिल्हा परिषद सिंधुदुर्गचे सदस्य मा. विक्रांत विकासभाई सावंत यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

विद्यार्थिनींमध्ये क्रीडाभावना, संघभावना, आत्मविश्वास आणि शारीरिक तंदुरुस्ती वाढावी, तसेच पारंपरिक मैदानी खेळांना प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

स्पर्धेमध्ये इयत्तानिहाय चार गटांमध्ये सामने रंगणार असून ५ वी विरुद्ध ६ वी, ७ वी विरुद्ध ८ वी, ९ वी विरुद्ध १० वी आणि ११ वी विरुद्ध १२ वी अशा सामन्यांचा समावेश आहे.

ही स्पर्धा शनिवार, दिनांक २९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ८ ते ११ या वेळेत दोडामार्ग इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या क्रीडांगणावर आयोजित करण्यात आली आहे. विद्यार्थिनींच्या उत्स्फूर्त सहभागामुळे स्पर्धेत चुरस निर्माण होणार असून राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा करण्यासाठी शाळेने जय्यत तयारी केली आहे.

“खेळूया, शिकूया, तंदुरुस्त राहूया आणि प्रगती करूया!” या संदेशातून विद्यार्थिनींना खेळाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्याची प्रेरणा मिळणार आहे.

You cannot copy content of this page