Headlines

सावंतवाडी तालुका काँग्रेसची १ सप्टेंबरला बैठक…

⚡सावंतवाडी,ता.२७-: सावंतवाडी तालुका काँग्रेस कमिटीची बैठक मंगळवार, दि. १ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता सावंतवाडी उभाबाजार येथील राजू मसुरकर यांच्या जीवनरक्षा कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे.

या बैठकीस जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष नागेश मोर्ये आणि जिल्हा सरचिटणीस सुभाष दळवी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. बैठकीस तालुका काँग्रेस कमिटीचे सर्व पदाधिकारी व सदस्य, प्रांतिक सदस्य, सेवादल, महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, एन.एस.यू.आय., ओबीसी विभाग, अल्पसंख्याक विभाग तसेच विविध सेलचे तालुका अध्यक्ष, लोकसभा व विधानसभा निवडणुकीतील उमेदवार, आजी-माजी नगराध्यक्ष, नगरसेवक, माजी जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, आजी-माजी ग्रामपंचायत सरपंच व सदस्य यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
बैठकीस सर्व पदाधिकारी, नेते व कार्यकर्त्यांनी वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन सावंतवाडी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अभय मालवणकर यांनी केले आहे.

You cannot copy content of this page