13 ऑक्टोबरचे आंदोलन स्थगित
⚡कणकवली ता.१२-: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून सिंधुदुर्ग विभागीय कार्यालयात कार्यरत कर्मचारी यांचे माहे सप्टेंबर २०२२ चे मासिक वेतन विहीत तारखेपर्यंत प्राप्त न झालेले नाही सदर वेतन 12 ऑक्टोबर पर्यंत प्राप्त न झाल्यास 13 ऑक्टोबर पासून कोणत्याही क्षणी आंदोलना सारख्या मार्गाचा अवलंब करावा लागेल असा इशारा राज्य परिवहन महामंडळाच्या सिंधुदुर्ग विभागातील कर्मचाऱ्यांनी दिला होता मात्र कामगारांच्या एकजुटीमुळे कामगारांना अखेर 12. ऑक्टोबर रोजी पगार प्राप्त झाला आहे त्यामुळे आंदोलन करण्या आधीच कर्मचाऱ्यांचा प्रश्न निकाली निघाला आहे.
याबाबतचे निवेदन विभाग नियंत्रक सिंधुदुर्ग त्याचप्रमाणे मुख्यमंत्री व संबंधितांना पाठविले आहे या निवेदनात ते म्हणतात, रा. प. कर्मचारी सिंधुदुर्ग विभाग आपणास विनंती करतो की, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून अधिकारी व कर्मचारी यांचे वेतन दर महिन्याच्या ७ तारखेला अदा केले जाते. परंतु माहे सप्टेंबर २०२२ चे वेतन विभागीय कार्यालयात काम करणारे कर्मचारी वगळता अन्य कर्मचाऱ्यांचे अदा केले आहे. ही आम्हा विभागीय कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर अन्याकारक बाब असुन त्यामुळे आमच्या आर्थीक परिस्थितीवर विपरीत परिणाम झालेला आहे. ही बाब महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांमध्ये दुजा भाव व गट निर्माण करणारी आहे. माहे ऑक्टोबर मध्ये येणारा दिवाळी सण पाहता सदर सणाच्या अगोदर कर्मचाऱ्यांना आगाऊ सण उचल बोनस व वेतन आगाऊ अदा करणे आवश्यक असताना आपण त्यापासुन कर्मचाऱ्यांना वंचित ठेऊन आम्हावर व आमच्यावर अवलंबुन असणाऱ्या कुटुंबावर अन्याय केलेला आहे. तरी आज १२.१०.२०२२ रोजी सायंकाळी १७.०० वा. पर्यंत आमचे देय वेतन अदा करण्यात यावे. व आमच्यावर झालेला अन्याय दुर करण्यात यावा. अन्यथा आम्हा सर्व कामगारांमध्ये असंतोष निर्माण झाल्याने आम्ही १३.१०.२०२२ पासुन कोणत्याही क्षणी आंदोलनासारख्या मार्गाचा अवलंब करु शकतो. त्यामुळे होणाऱ्या नुकसानीस महामंडळ पूर्णपणे जबाबदार राहील.असा इषारा देण्यात आला होता मात्र 12 ऑक्टोबर रोजी एसटी कर्मचाऱ्यांना पगार प्राप्त झाल्याने आंदोलन स्थगित झाले आहे.
