Headlines

पाट हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची चित्रकलेत बाजी

विविध स्पर्धांत चमकदार कामगिरी

कुडाळ : पाट हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध विषयांवर चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. वन्यजीव सप्ताहानिमित्त वन्यजीव संवर्धनाबाबत जनजागृती करण्यासाठी कांदळवन आणि कासव संवर्धन या विषयांवरील चित्रफिती दाखविण्यात आल्या. तसेच विद्यार्थ्यांमध्ये वन्यजीवांविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. यासह व्यसनमुक्त भारत, प्लास्टिकमुक्त भारत आणि विकसित भारत या विषयांवरही विविध स्पर्धा घेण्यात आल्या. या सर्व उपक्रमांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
वन्यजीव संवर्धन चित्रकला स्पर्धेत धनिशा निलेश परब हिने प्रथम, अंतरा सत्यवान दुतोंडकर हिने द्वितीय, तर पूर्वा प्रकाश मुणगेकर हिने तृतीय क्रमांक पटकाविला.
‘व्यसनमुक्त भारत’ चित्रकला स्पर्धेत गौरव सुंदर गावडे याने प्रथम, अथर्व सावळाराम म्हापणकर याने द्वितीय, तर वीरा वरद रेवणकर हिने तृतीय क्रमांक मिळविला. उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक सर्वेश समाधान हिरे याने, तर उत्तेजनार्थ द्वितीय क्रमांक चैताली कृष्णा हंजनकर हिने मिळविला.
‘प्लास्टिकमुक्त भारत’ चित्रकला स्पर्धेत आराध्या नामदेव घाडी हिने प्रथम, पूर्वी सुहास परब हिने द्वितीय, तर श्रीपाद आनंद म्हापणकर याने तृतीय क्रमांक मिळविला. उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक विजय विलास घारे याने, तर उत्तेजनार्थ द्वितीय क्रमांक गंधार सद्गुरू रावले याने पटकाविला.

‘विकसित भारत’ विषयावरील स्पर्धेतही विद्यार्थ्यांचे यश

‘विकसित भारत’ या विषयांतर्गत आयोजित विविध स्पर्धांमध्ये कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांमध्ये अभिनय देविदास देऊलकर याने प्रथम, स्वरांगी समीर परब हिने द्वितीय, तर भावेश मुकुंद कुडव याने तृतीय क्रमांक मिळविला. माध्यमिक विभागात धनिशा निलेश परब हिने प्रथम, मृणाली अभिजीत पाटकर हिने द्वितीय, तर दुर्वा दत्तात्रय म्हैसकर हिने तृतीय क्रमांक पटकाविला.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक सयाजी बोंदर, पर्यवेक्षिका अंकिता मोडक, जिल्हा परिषद सदस्य यज्ञा साळगावकर, पूर्वा नाईक, नंदिनी बुरुड तसेच इतर शिक्षकांनी कौतुक केले. संस्थेतर्फेही या उपक्रमांचे आणि विद्यार्थ्यांच्या यशाचे विशेष कौतुक करण्यात आले.

पाट हायस्कूलमध्ये वर्षभर चित्रकला, शिल्पकला, नृत्यकला, गायनकला अशा विविध कलाविषयक स्पर्धांचे आयोजन केले जाते. यामुळे विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळण्याबरोबरच त्यांना विविध कलाक्षेत्रांची ओळख होण्यास मदत होते.
या स्पर्धांचे पारितोषिक वितरण वनक्षेत्रपाल चेतन पाटील (कुडाळ), वनपाल सूर्यकांत सावंत (नेरूर तर्फ हवेली), वनरक्षक समीर खरवत (नेरूर तर्फ हवेली), वनरक्षक प्रसाद पाटील (आकेरी), यशवंत कदम, मंदार गावडे तसेच जलद बचाव कृती पथकाच्या सदस्यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

You cannot copy content of this page