Headlines

मळगाव घाटीत ऑईल सांडल्याने अपघात…

कार्यकारी अभियंत्या अनामिका चव्हाण यांची तत्परता; माती टाकून अपघाताचे प्रकार टाळले.. ⚡सावंतवाडी ता.२०-: मळगाव घाटीत धबधब्यासमोर ऑइल सांडल्याने अपघाताचे प्रकार घडले. हा प्रकार सायंकाळी सात वाजता घडला. दरम्यान घटनेची माहीती पोलिस निरिक्षक फुलचंद मेंगडे यांनी सार्वजनिक बांधकामच्या कार्यकारी अभियंत्या अनामिका चव्हाण यांना देताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी कर्मचारी पाठवत माती मारुन घेत अपघाताचे प्रकार टाकले.

Read More

३० हजाराची लाच घेताना उपनिरीक्षक, पोलीस नाईक एलसीबीच्या जाळ्यात

वैभववाडी पोलीस ठाण्यातील प्रकार;खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत ४० हजारांची केली होती मागणी वैभववाडी प्रतिनिधीवैभववाडी पोलीस स्टेशन मध्ये तक्रारदाराच्या विरोधात 376 कलमान अंतर्गत गुन्हा दाखल करतो असे सांगून गुन्हा दाखल न करण्याकरिता चाळीस हजाराची लाज मागल्या प्रकरणी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक सुरज शिवाजी पाटील व पोलीस नाईक मारुती संतराम साखरे हे दोघे…

Read More

नूतन तहसीलदार श्रीमती देसाई यांचे काँग्रेसने केले स्वागत

वैभववाडी संजय शेळकेवैभववाडी तालुका राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने वैभववाडी तालुका तहसीलदार पदावर नुकत्याच हजर झालेल्या श्रीमती देसाई मॅडम यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करताना वैभववाडी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष दादामिया पाटणकर, महिला तालुकाध्यक्ष तथा माजी सभापती मीनाताई बोडके,अध्यक्ष दादामीया पाटणकर, माजी सभापती मीनाताई बोडके,उपाध्यक्ष वसंत नाटेकर, दिलीप रावराणे, वासिम काझी , श्रेया मुद्रस , अशोक राणे इत्यादी पदाधिकारी…

Read More

सिंधुदुर्गातील शिक्षकांचे प्रश्न वर्षभरात सोडविणार – शिक्षक आम. ज्ञानेश्वर म्हात्रे

⚡मालवण ता.२०-: शिक्षक आमदार बनल्यावर आपण अर्थसंकल्पीय अधिवेशनात शिक्षकांचे सर्व प्रश्न मांडले. शिक्षक पेन्शन व इतर प्रश्नांबाबत आपण मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा केली असून प्रश्न सोडविण्यासाठी ते सकारात्मक आहेत. आमदार बनल्यावर आपण कोकणला व विशेषतः सिंधुदुर्गला प्राधान्य दिले असून सिंधुदुर्गातील शिक्षकांचे प्रश्न वर्षभरात आपण सोडविणार, अशी ग्वाही शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी येथे बोलताना…

Read More

बाबासाहेबांच्या राजकीय विरोधकांपेक्षा त्यांचे सांस्कृतिक विरोधक धोकादायक

कोल्हापूर येथील व्याख्यानात कवी अजय कांडर यांचे प्रतिपादन ⚡कणकवली ता.२०-: डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्व समाजासाठी आपले योगदान दिले.तरीही जातीच्या उतरंडीवरील सर्व समाजाने त्यांना आपले मानले नाही.असे झाले असते तर देशाच्या घराघरात बाबासाहेबांची जयंती साजरी झाली असती.बाबासाहेबांच्या राजकीय विरोधकांपेक्षा त्यांच्या सांस्कृतिक विरोधकांमुळेच हे असे घडू शकल्याने बाबासाहेबांच्या राजकीय विरोधकांपेक्षा त्यांचे सांस्कृतिक विरोधक अधिक धोकादायक असल्याचे प्रतिपादन…

Read More

मारहाणप्रकरणी चार जणांची निर्दोष मुक्तता

⚡मालवण ता.२०-: मालवण दांडी येथील आनंद अतुल हुले यांना मारहाण करून त्यांच्या गाडीचे नुकसान केल्याच्या आरोपातून राज गणेश जाधव यांच्यासह चार जणांची मालवण येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी वर्ग १ एम. आर. देवकाते यांनी निर्दोष मुक्तता केली आहे. संशयितांच्या वतीने अॅड. रूपेश परुळेकर यांनी युक्तिवाद केला. ही मारहाणीची घटना १७ सप्टेंबर २०२१ रोजी देऊळवाडा सागरी महामार्गा…

Read More

राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर उद्या सिंधुदुर्गात…

⚡सावंतवाडी ता.२०: शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर हे उद्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.

Read More

मराठी, इंग्रजीसोबतच हिदी भाषाही आत्मसात करा…

आत्माराम सोकटे;हिदी प्रचार सभेतर्फे आदर्श हिदी अध्यापक पुरस्कार वितरण वेंगुर्ला प्रतिनिधी- हिदी भाषेला मोठी ज्ञानपरंपरा व साहित्यिक पार्श्वभूमी लाभली असून, विचारांचे आदान प्रदान करण्याची संपूर्ण भारतीय उपखंडातील ही एक महत्त्वाची भाषा आहे. देशातील आजच्या व्यापार जगताची मुख्य भाषा सुद्धा हिदीच आहे. त्यामुळे मातृभाषा मराठी व ज्ञानभाषा इंग्रजी सोबतच तितक्याच आत्मियतेने आपण हिदी भाषा आत्मसात केली…

Read More

वेंगुर्ले नगरपरिषद ‘शहर सौंदर्यीकरण २०२३’ स्पर्धेत राज्यात प्रथम

⚡वेंगुर्ले ता.२०-: महाराष्ट्र शासन नगरविकास विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या शहर सौंदर्यीकरण २०२३ या स्पर्धेत वेंगुर्ला नगरपरिषदेने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला. स्वच्छतेमध्ये या नगरपरिषदेने राज्यात आपला डंका कायम ठेवला आहे. दरम्यान मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत १५ कोटींचा धनादेश व प्राणपत्र देत शासनाने वेंगुर्ला नगरपरिषदेचा सन्मान केला.मुंबई येथे झालेल्या सन्मान सोहळ्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

Read More

बसवेश्वर महाराज यांच्या जयंतीनिमित्त २२ रोजी कणकवलीत विविध कार्यक्रम

कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे वीरशैव लिंगायत समाजातर्फे आवाहन…! ⚡कणकवली ता.२०-: लिंगायत समाजाचे आराध्य दैवत श्री बसवेश्वर महाराज यांची जयंती कणकवलीतील लिंगायत समाजाच्यावतीने शनिवार २२ एप्रिलला कांबळीगल्लीतील नियोजित लिंगायत समाज मंदिराच्या जागेत साजरी केली जाणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. सकाळी ११ वाजता श्री गणेश पूजा, श्री बसवेश्वर महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन,…

Read More
You cannot copy content of this page