डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेकरिता प्रस्ताव द्या

जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी

⚡सिंधुदुर्गनगरी ता.१३-: महाराष्ट्र शासन, अल्पसंख्याक विकास विभाग, मंत्रालय, मुंबई यांच्याकडून ” डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना ” सन २०२३-२४ मध्ये राबविण्यात येत आहे. राज्यातील धर्मादाय आयुक्त अथवा वक्फ बोर्डाकडे नोंदणीकृत व जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रातील मदरशांनी विहित अटी व शर्तीची पूर्तता करुन सन २०२३-२४ या वर्षाकरिता विहित नमुन्यातील अर्जासह परिपूर्ण प्रस्ताव शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) यांचेमार्फत जिल्हा नियोजन समिती, जिल्हाधिकारी कार्यालयाकडे दि. ३० जून पर्यंत सादर करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी केले आहे.

विहित अर्जाचा नमुना याबाबतचा अधिक तपशील महाराष्ट्र शासन निर्णय क्र. अविवि-२०१०/प्र.क्र.१५२/१०/का.६ दिनांक ११ ऑक्टोबर २०१३ मध्ये व www.sindhudurg.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. विहित मुदतीनंतर प्राप्त अर्जांची दखल घेण्यात येणार नाही.

You cannot copy content of this page