⚡सिंधुदुर्गनगरी ता.१३-: जिल्ह्यातील बाल न्याय मंडळ सदस्य पदासाठीच्या इच्छुक व पात्र उमेदवारांनी दि. २१ जून रोजी दु. ३ वाजेपर्यंत मोठ्या संख्येने प्रस्ताव सादर करावेत.
बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण अधिनियम २०१५) सुधारित अधिनियम २०२१ व महाराष्ट्र नियम २०१८ मधील तरतुदीनुसार प्रत्येक जिल्ह्यासाठी बाल न्याय मंडळ गठीत करण्यात आलेले आहे. त्याअनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बाल न्याय मंडळ रिक्त सदस्य पदासाठी विहित पात्रतेचे निकष पूर्ण करणाऱ्या उमेदवारांकडून नामांकने मागविण्यासाठीची जाहिरात दि. ७ जून २०२३ रोजी, दैनिक सकाळ सिंधुदुर्ग आवृत्ती मध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे.
बाल न्याय मंडळ सदस्य पदासाठीची पात्रता : वय ३५ वर्षापेक्षा कमी नसावे शिक्षण आरोग्य व कल्याण कार्याच्या क्षेत्रातील बालकांसोबत काम करण्याचा किमान सात वर्षाचा अनुभव असावा आणि शिक्षणशास्त्र समाज किंवा मानसशास्त्रामध्ये पदवीत्तर पदवी किंवा एम.बी.बी.एस. किंवा कायद्यातील पदवी अशी शैक्षणिक अहर्ता असावी.
मार्गदर्शक सूचनांमध्ये नमूद केले नुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बाल न्याय मंडळ सदस्य पदासाठीच्या इच्छुक व पात्र उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्ज दि. २१ जून २०२३ रोजी दु. ३ वाजेपर्यंत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, प्रशासकीय इमारत ए ब्लॉक, तळमजला,ओरोस सिंधुदुर्गनगरी दूरध्वनी क्र. (०२३६२-२२८८६९) येथे सादर करावा. सदरचा विहित नमुना अर्ज व अर्जासोबत सादर करावयाची हमीपत्रे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग येथे उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी या कार्यालयाशी प्रत्यक्ष किंवा दूरध्वनीद्वारे संपर्क साधावा. तसेच शासनाच्या www.maharashtra.gov.in व महिला व बालविकास आयुक्तालयाच्या www.wedcommpune.com या अधिकृत संकेत स्थळाला भेट द्यावी.
