बांदा/प्रतिनिधी
दहावी व बारावी परीक्षेत उज्वल यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा वाफोली गावाच्या वतीने सरपंच उमेश शिरोडकर व उपसरपंच विनेश गवस यांनी सत्कार केला.
यावेळी कांतीलाल वळवी विस्तार अधिकारी कांतीलाल वळवी उपस्थित होते. वाफोली ग्रामपंचायत सभागृहात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी गुणवंत विद्यार्थी वेदिका खानोलकर, मानसी देसाई, योग गवस, रमेश गवस, अवंती गवस, हर्षद गवस, गीता गवस, क्षितिजा सावंत, मितेश आईर, किरण परब, दत्ताराम परब, मयंक आईर, इशिता सावळ, विवेक ठाकूर, नलिनी घोगळे, आस्था वझरकर, जीवन पाटील, रुची सावंत या विद्यार्थांचा गुलाबपुष्प, सन्मान चिन्ह व सुपारीचे रोप देत मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर वाफोली सरपंच उमेश शिरोडकर, उपसरपंच विनेश गवस, ग्रामपंच्यायात सदस्य मंथन गवस, साक्षी शिरोडकर, मंजुळा शेगडे, स्नेहा आईर, पोलीस पाटील आना गवस, प्रमुख पाहुणे बांदा पानवळ कनिष्ठ महाविद्यालयाचे मनोज देसाई, सौ. अदिती पिळणकर, सौ.
समिधा आमडोसकर आदी उपस्थित होते. ग्रामसेवक प्रसाद ठाकूर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. तर आभार प्रदर्शन विनेश गवस यांनी केले.
वाफोली गावाच्या वतीने दहावी बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव…
