टोल वसुलीला सत्ताधाऱ्यांची घाई ;१४ रोजी ओसरगाव येथे आंदोलन
⚡कणकवली ता.१३-: सिंधुदुर्ग जिल्हा वाशीयांचा विरोध असतानाही मुंबई गोवा मार्गावरील ओसरगाव येथे 14 जून पासून टोल वसूली सुरू करण्याचा घाट घातला जात आहे. एम एच 07 वाहनांना जोपर्यंत टोल माफी मिळत नाही तोपर्यंत शिवसेनेचा या टोल वसुलीला विरोध असणार आहे त्यामुळे टोल वसुलीच्या विरोधात सिंधुदुर्ग जिल्हावाशीयांनी ओसरगाव टोल नाक्यावर 14 जून रोजी सकाळी 10 वाजता एकत्र यावे. असे आवाहन शिवसेना नेते संदेश पारकर यांनी केले आहे.
सिंधुदुर्गात टोल धाडीचे रॅकेट 14 जूनपासून सक्रिय होणार आहे. त्यामुळे याचा त्रास सिंधुदुर्ग जिल्हा वाशीयांना सहन करावा लागणार आहे.आणि तशी केंद्रीय वाहतूक मंत्रालयाने निविदा प्रसिद्ध केली आहे.त्यामुळे उद्या टोल वाहन चालकांनी भरू नये अशी भूमिका शिवसेनेचे नेते संदेश पारकर यांनी घेतली आहे.
ओसरगाव टोल नाक्यावरून 14 जून पासून टोल वसुलीला सुरुवात होणार आहे. गेली पाच वर्षापासून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मुंबई गोवा महामार्गाचे काम सुरू आहे. आतापर्यंत 80 %रस्ता पूर्ण झाला आहे.झाराप ते खारेपाटण पर्यत रस्त्याचा काही भाग अपूर्ण राहिलेला आहे. या महामार्गासाठी जिल्हा वाशियानी संपूर्ण सहकार्य केले.शेतकऱ्यांनी जमिनी दिल्या तसेच काही शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला मिळालेला नाही.जिल्ह्यातील
च्या गाड्यांना टोल माफी मिळावी ही मागणी जिल्हा वाशियानी लावून धरली आहे.टोल वसुलीच्या तारखा हायवे प्राधिकरण दरवेळी देत आहे.या टोल वसुलीला शिवसेना म्हणून कडाडून विरोध आहे.जिल्हा वाशियांना लुटण्याच काम केंद्र सरकारकडून होत आहे .याला वेळीच आळा बसला पाहिजे म्हणूनच एम एच 07 च्या वाहनांना टोल माफी मिळालीच पाहिजे अशी भूमिका शिवसेनेने घेतली आहे.14 रोजी होणारे आंदोलन हे निखाऱ्यासारख धगधगत असणार आहे.
ओसरगाव टोल नाक्यांमुळे जिल्ह्याचे विभाजन होत आहे.या टोलमुळे मालवण,कणकवली, देवगड, वैभववाडी या तालुक्यांना टोलचा भुर्दंड सोसावा लागणार आहे.या टोल बाबत अनेक वेळा खासदार विनायक राऊत ,आमदार वैभव नाईक यांनी सुद्धा वारंवार पत्र व्यवहार केलेला आहे.तसेच टोल वसुलीला विरोध करत असताना जिल्हा वाशीयांचे सहकार्य देखील महत्वाचं आहे.
या टोल वसुलीच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.त्यामुळे टोल वसुलीची घाई सत्ताधाऱ्यांना लागलेली आहे.सात ते साडेसात लाख रुपये सरकारला दिवसाला भरायचे आहे.त्या टोल नाक्यांवर अकरा ते साडे अकरा लाख रुपये वसुली होणार आहे. म्हणजेच चार लाख रुपये दररोज ठेकेदार आणि सत्ताधारी हडप करणार आहेत म्हणूनच यांना टोल वसुलीची घाई झाली असल्याचा आरोप संदेश पारकर यांनी केला.
