वारक-यांवरील लाठीचार्जचा राष्ट्रवादीकडून निषेध

⚡वेंगुर्ला ता.१३-: वारकरी समुदायावर करण्यात आलेल्या लाठीचार्जाबाबत वेंगुर्ला राष्ट्रवादीकडून निषेध केला असून तशा प्रकारचे निवेदन वेंगुर्ला तहसिलदार यांना दिले आहे.

  त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, संत तुकाराम महाराज देहू येथे वारकरी संप्रदाय समाजावर राज्य सरकारच्या दडपशाहीने पोलिसांनी नाहक लाठीचार्ज केला. आज हजारो वर्षे हा वारकरी समाज नित्य नेमाने ऊन, पाऊ, वारा याची पर्वा न करता व कोणाही इतर आस्थापनांना, समाजाला व शासनाला त्रास किवा उपद्रव न करता आपल्या वारीद्वारे संत महतांच्या स्थानांना भेटी देत असतात.

  परंतु शासनाच्या नियजन शून्य कारभाराचे खापर या निरपराधी सर्वसामान्य वारक-यांवर अमानुषपणे लाठी चार्ज आणि दडपशाही करुन फोडण्यात आले व वारकरी सांप्रदायांना बदनाम करण्यात आले. याचा आम्ही जाहिर निषेद करीत असल्याचे म्हटले आहे. निवेदन सादर करतेवेळी राष्ट्रवादीचे डॉ.संजिव लिगवत, नितीन कुबल, नम्रता कुबल, योगेश कुबल, प्रज्ञा परब, सत्यवान साटेलकर, बावतीस डिसोजा, वैभव वाडेकर, सुयोग खानोलकर व शिवाजी गावडे आदी उपस्थित होते.
You cannot copy content of this page