⚡वेंगुर्ला ता.१३-: प्रतिवर्षाप्रमाणे वैष्णव गुरुवर्य मामा दांडेकर दिंडी आषाढी पायी वारी ह.भ.प. देवदत्त परुळेकर (वेंगुर्ला) यांच्या नेतृत्वाखाली चालणार आहे. या दिंडीत बेळगांव, गोवा व सिंधुदुर्गातील सुमारे २०० भावीक सामील होत असतात. वैष्णव दिगंबरपंत परुळेकर यांनी या दिंडी सेवेची सुरुवात ३६ वर्षे दिंडीचे नेतृत्व केले आहे. यंदा दिंडीचे हे ५६ वे वर्ष आहे.
दिंडीची सुरवात रविवार दि. १८ जून २०२३ रोजी सायंकाळी ७ वा. पंढरपूर येथील श्री विठ्ठल मंदीरातील परुळेकर यांच्या वारकरी कीर्तनाने होणार आहे. दि. १९ जून रोजी दिंडीचा मुक्काम फलटण येथे होईल. दि.२० ते २६ जून पायी वारीची फलटण ते वाखरी अशी वाटचाल होईल. ज्यांना या दिंडीत सहभागी व्हायचे असेल किवा दिंडीस सहकार्य करावयाचे असेल त्यांनी डॉ. भास्कर परुळेकर (९४४९१३९४४९) यांच्याशी संफ साधावा.
