Headlines

खावटी कर्जात अडकलेल्या शेतकऱ्यांना दिलासा…

मनिष दळवी; कर्जाची रक्कम शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात जमा; ⚡ओरोस ता.०४-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने मधील खावटी कर्जात अडकलेल्या व थकीत झालेल्या ७५६४ शेतकऱ्यांना राज्य शासनाने दिलासा दिला आहे. या शेतकऱ्यांचे १२ कोटी ७४ लाख ८६ हजार कर्जाची रक्कम शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात जमा करण्याचा निर्णय सहकार मंत्री अतुल सावे यांनी बुधवारी झालेल्या…

Read More

हडी येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

⚡मालवण ता.०४-: हडी येथील मार्गेश्वर क्रीडा मंडळ आणि सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान, मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यामध्ये २५ जणांनी रक्तदान केले. जि. प. पूर्व प्राथमिक शाळा नं. २ जठारवाडी, हडी येथे हे शिबीर पार पडले. या शिबिराचे उदघाटन हडी गावचे सरपंच प्रकाश तोंडवळकर व सौ. आर्या गावकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन…

Read More

देवगडचे दिवाणी न्यायालय स्थलांतरित

जुन्या तहसिल कार्यालयातुन होणार कामकाज देवगड ता.०४-: देवगड दिवाणी न्यायालयाच्या सद्यस्थितीत असलेल्या इमारतीच्या जागी नवीन इमारत हाेणार असल्यानेदेवगड दिवाणी न्यायालय एसटी स्टॅण्ड समाेरील तहसिलकार्यालयानजिक असलेल्या जुन्या तहसिलकार्यालयाच्या इमारतीमध्ये स्थलांतरीत करण्यातआले असून ८ मे पासून त्या इमारतीमध्ये न्यायालयीनकामकाजाला सुरूवात हाेणार आहे. सध्या कार्यरत असलेल्या देवगड दिवाणी न्यायालयाचीइमारत ही जुनी झाली असून ती पाडूनत्या जागी नवीन इमारत…

Read More

एस टी बस व मोटारसायकल अपघातात पत्नी ठार तर पती गंभीर जखमी

देवगडदेवगड आगारातून सकाळी ९.०० वाजता सुटणारी देवगड तुळजापूर बस फेरीचा कोल्हापूरच्या अलीकडे दोनवडे फाटा येथे समोरून येणाऱ्या टू व्हीलर ला धडक दिल्याने मोटर सायकलवर मागे बसलेल्या अरुंधती बाळासाहेब पाटील व ४८ यांचा जागीच मृत्यू झाला आहे सदरची घटना बुधवारी दुपारी १.१५ वाजण्याच्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार, देवगड आगारातून बुधवारी सुटलेली देवगड तुळजापूर बस फेरी गाडी…

Read More

निलेश राणे यांनी केलेल्या घातपात वक्तव्याची उच्चस्तरीय चौकशी करा…

खास.विनायक राऊत;उद्धव ठाकरे बारसुत ६ मे रोजी ग्रामस्थांना भेटणार.. ⚡कणकवली ता.०४-:बारसू येथे मोठा घातपात होण्याची शक्यता आहे,जिलेटिन स्पोटके येत आहेत,असे विधान निलेश राणे यांनी केले आहे .केवळ उद्धव ठाकरे ६ मे रोजी ग्रामस्थांना भेटण्यासाठी येत असल्यामुळे ग्रामस्थांची दिशाभूल करण्यासाठी हे वक्तव्य करीत आहेत.त्यामुळे निलेश राणेंची सरकारने उच्चस्तरीय चौकशी करावी.दोन्ही जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांनी याबाबत गंभीर दखल…

Read More

अवैद्य धंदे व भोंग्याबाबत मनसेने वेधले लक्ष…

पोलिस उपविभागीय अधिकाऱ्यांशी चर्चा; कारवाईची मागणी सावंतवाडी ता.०५-: प्रार्थना स्थळांवरील भोंगे व अवैद्य धंद्याबाबत आजमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी रोहिणी सोळंके यांची भेट घेत चर्चा केली.सावंतवाडी तालुक्यातील चालू असलेल्या अवैद्य धंद्यांमुळे युवा पिढी व्यसनांच्या आड जाऊन बरबाद होत आहे याला आळा बसावा अशी मागणी केली.यावेळी पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेऊन प्रार्थनास्थळांवरील भोंग्यांचा आवाज तपासण्यात…

Read More

दारू वाहतूक प्रकरणी गुजरात येथील दोघांना सशर्त जामीन

⚡सावंतवाडी ता.०४-: इन्सुली चेकपोस्टवर अवैध पद्धतीने दारू वाहतूक करणाऱ्या ट्रकवर बांदा पोलीसांनी गुजरात येथील दोघांवर गुन्हा दाखल करीत त्यांना अटक करण्यात आली होती. प्रदीपकुमार प्रसाद आणि मोहम्मद इंद्राशी अशी दोघांची नावे असून त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना सशर्त जामीन मंजूर केला आहे. याकामी अँड पंकज आपटे यांनी काम पाहिले.

Read More

खरीब हंगामसाठी कृषी विभागाने दक्ष रहावे…

मंत्री रविंद्र चव्हाण; बी-बियाणांची फसवणूक करण्याऱ्यावर गुन्हे दाखल करा. ⚡ओरोस ता.०४-: खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना वेळेत खते आणि बी-बियाणे उपलब्ध होतील याबाबत कृषी विभागाने दक्ष रहावे, सेंद्रीय खतांच्या नावाने माती विकणाऱ्यांवर त्याबरोबरच बी-बियाणांची फसवणूक करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत,असे निर्देश पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात पालकमंत्र्यांनी आज जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठक घेतली. या…

Read More

पाडलोस गाव व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून 20 जणांनी केले रक्तदान

⚡बांदा ता.०४-: पाडलोस गाव व्हाट्सअप ग्रुप हा मनोरंजनाचा ग्रुप नसून समाजशील कार्यकर्त्यांचा ग्रुप आहे. ग्रुपच्या माध्यमातून रक्तदान शिबिर होणे ही खूप मोठी बाब आहे. त्यामुळे हा पाडलोस व्हाट्सअप गाव ग्रुप समाजापुढे एक आदर्श निर्माण करत असल्याचे प्रतिपादन, सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश तेंडुलकर यांनी केले. पाडलोस गाव व्हाट्सअप ग्रुप आयोजित रक्तदान शिबिरात श्री. तेंडुलकर बोलत…

Read More

अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी एकाला जामीन…

⚡सावंतवाडी ता.०४-: अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी अटक असलेल्या संशयिताचा जिल्हा व सत्र न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. याकामी आरोपीच्या वतीने अँड. अनिल निरवडेकर व अँड गणेश चव्हाण यांनी काम पहिले.

Read More
You cannot copy content of this page