सुदैवाने मोठा अनर्थ टळला
⚡वेंगुर्ले ता.२५-: वेंगुर्ले तालुक्यात गेले दोन दिवसा पासून पाऊस सुरू झाला असून आज सकाळी ८:३० च्या सुमारास वेंगुर्ला शहरातील पिराचा दर्गा येथे भले मोठे जुने आंब्याचे झाड विजेच्या खांबासह तारा तोडत रस्त्यावर कोसळले. यामुळे या मार्गावर काहीकाळ वाहतूक विस्कळीत झाली. तर येथील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविली.मात्र वीज वितरण चे मोठे नुकसान झाले आहे.
सकाळी झाड कोसळले त्यावेळी रस्त्यावर कोणीही नसल्याने जीवितहानी टळली.
दरम्यान आंब्याचे झाड विद्युत वाहिनीवर कोसळल्याने विद्युत खांबांचे तसेच रस्त्यालागत असलेल्या छोट्या दुकानाचे, शॉपीच्या डिजिटल फलकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
याबाबत वेंगुर्ला नगरपरिषदेला समजताच कर्मचारी व महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनीचे कर्मचारी दाखल झाले असून वेंगुर्ला नगर परिषद कर्मचाऱ्यांकडून झाड बाजूला करून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करण्याचे काम सुरु आहे.
