बांदा/प्रतिनिधी
बांदा शहरातील साईभक्त (कै.) बाप्पा केसरकर संस्थापीत साईमठातील प्रत्यक्ष १०४ वर्षापूर्वी श्री साईबाबांनी दिलेल्या ऐतीहासीक साई तसबीरीचे दर्शन तामीळनाडुतील साईभक्तानी बांद्यात येवून घेतले.दिपक राजा, धाना शेकर हे दोन साई भक्त तामीळनाडू राज्यातील असून सध्या बाबांच्या सेवेत शिर्डीत राहत आहेत.
श्री साई सतचरीत्रात उल्लेख असलेल्या सर्व साईभक्ताचा व त्यांच्या सर्व गोष्टीचा अभ्यास त्याच्या पिढीकडुन जाणुन घेवून त्याचा अभ्यास ते करत आहेत. त्या साई भक्ताना बाबानी आपल्या पवीत्र हातानी दिलेल्या जुन्या वस्तूचा, त्याकाळच्या बाबा सोबतच्या आठवणी त्यांच्या परीवाराकडून जाणुन घेत आहेत. साईमठात या साईभक्ताचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान श्री साईबाबा भक्त सेवा मंडळाचे उपाध्यक्ष रवींद्र मालवणकर, विश्वस्त निखिल मयेकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मंडळाचे अध्यक्ष व बाप्पाचे नातू राकेश केसरकर यानी या साईमठाचा व साई तसबीरीचा सर्व इतीहास कथन केला. यावेळी सौ. दर्शना केसरकर, निलेश मोरजकर, यशवंत माधव आदी उपस्थित होते.
फोटो :-
बांद्यातील साईमठात तामीळनाडूतील साईभक्त धाना शेकर, दिपक राजा याना शाल व श्रीफळ देताना रविंद्र मालवणकर, निखिल मयेकर. सोबत राकेश केसरकर , सौ. दर्शना केसकर, यशवंत माधव व इतर. (छायाचित्र – निलेश मोरजकर)
