बांदा/प्रतिनिधी
मुंबईची प्रसिध्द मानाची पालखी साईलीला मंडळ लालबाग या मंडळाचे अध्यक्ष राम खाटपे यांनी बांदा शहरातील (कै.) बाप्पा केसरकर संस्थापीत साईमठास भेट देऊन ऐतीहासीक साई तसबीरीचा इतीहास जाणुन घेतला.
यावेळी त्यांच्यासोबत प्रदीप साळुंखे, सुधाकर घाडी, संदीप चव्हाण, खोटले श्री स्वामी समर्थ मठाचे मठाधीष गणेश घाडीगावकर आदी उपस्थित होते. यावेळी राम खाडपे याना श्री साईबाबा भक्त सेवा मंडळाच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन श्री साईबाबा भक्त सेवा मंडळाचे अध्यक्ष राकेश केसरकर यांच्या हस्ते गौरविण्यात आले. शेकडो भावीक या परीक्रमेत सहभागी होत असतात. यावेळी साईसेवेचा अनुभव त्यानी कथन केला.
साई तसबीरीचा इतीहास राकेश केसरकर यानी त्याना सांगीतला. तसेच श्री साईबाबा भक्त सेवा मंडळाच्या दरवर्षी राबवीत असलेले सामाजीक उपक्रम, निरंतर साईमठात होणारे रामनवमी, दसरा उत्सव, बाबाचा पुण्यतीथी उत्सव, श्रीसाई सतचरीत्राचे सामुदायीक वाचन, दर गुरूवारी होणारी साई सेवा बाबत सविस्तर माहीती दिली. साईमठातील ऐतीहासीक साईतसबीर केसरकर कुटंबीयानी १०४ वर्षे जतन करून जी साई सेवा सुरु आहे या साई सेवेचे त्यांनी कौतुक केले.
फोटो :-
साईलीला मंडळाचे अध्यक्ष राम खाटपे यानी बांद्यातील साईमठात बाबांचे दर्शन घेतले. सोबत प्रदीप साळुंखे, सुधाकर घाडी, संदीप चव्हाण, श्री स्वामी समर्थ मठाचे मठाधीश गणेश घाडीगांवकर, राकेश केसरकर व इतर.
बांदा येथील साई मठाला राम खाटपे यांनी दिली भेट
