जुनाट वृक्षाची फांदी पडली घरावर

सुदैवाने जीवितहानी नाही: पानवळ येथील घटना

बांदा/प्रतिनिधी
मुसळधार पावसामुळे बांदा पानवळ येथील ग्रामपंचायत कर्मचारी तुळशीदास महादेव किनळेकर यांच्या राहत्या घराच्या नजिक जुनाट वृक्षाची फांदी कोसळून नुकसान झाले. मात्र सुदैवाने किनळेकर कुटुंबीय यातून बचावले.
ही घटना आज सकाळी घडली. सरपंच प्रियांका नाईक, तलाठी वर्षा नाडकर्णी, ग्रामपंचायत सदस्य बाळु सावंत यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत नुकसानीची पाहणी केली.

You cannot copy content of this page