शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची माहिती; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याची काळजी
सावंतवाडी ता.२५-: शून्य शिक्षक ही शाळेमध्ये विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी स्थानिक डी एड, बी एड धारकांची मेरिटवर तात्पुरत्या स्वरुपात नेमणूक करावी किंवा माजी शिक्षकांना नेमणुक द्यावी,यासाठी येणाऱ्या खर्च व निधीतून खर्च करावा अशी सुचना राज्यातील जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत अशी माहिती स्थानिक आमदार तथा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे दिली. तर जिल्ह्यातील विरोधकांनी रिकामे खोके घेऊन आंदोलने करावी मात्र भरलेले खोके मातोश्रीवर जातात हे सुद्धा त्यांनी लक्षात ठेवावे असा टोला हे त्यांनी आज लगावला.8
मंत्री केसरकर यांनी आज आपल्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली यावेळी ते बोलत होते त्यांच्यासोबत जिल्हाप्रमुख अशोक दळवी संजय आंग्रे तालुका प्रमुख बबन राणे आधी उपस्थित होते. ते म्हणाले, शून्यशिक्षकी शाळेवरून विरोधकांकडून टीका केली जात आहे परंतु महाराष्ट्रामध्ये पन्नास हजार शिक्षक भरती करणारा मंत्री आपण आहे यापूर्वी कधी एवढे मोठी भरती झाले होते का लवकरच दोन टप्प्यांमध्ये ही भरती होणार आहे यात पहिल्या टप्प्यात तीस हजार आणि दुसऱ्या टप्प्यात वीस हजार शिक्षक भरती केले जाणार आहे शिक्षिका अभावी कुठली शाळा राहणार नाही.
सद्यस्थितीत शून्यशिक्षकी शाळाबाबत तात्पुरता तोडगा काढण्यासाठी त्या त्या जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना तेथील स्थानिक डिएड बीएड धारकांची स्थानिक पातळीवर परीक्षा घेऊन मेरिटलिस्ट वर त्यांची तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्याच्या सूचना केल्या आहेत याशिवाय दुसरा पर्याय म्हणून निवृत्त शिक्षकांनाही या जागी नेमणूक करण्याची सूचना केली आहे परंतु ज्यावेळी शिक्षक भरती होईल त्यावेळी त्यांना त्या ठिकाणी कमी करण्यात येणार आहे.महाराष्ट्रातील प्रत्येक शाळेत 100% पुस्तके पुरवली आहेत राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात ही पुस्तके पोचली आहेत परंतु काही ठिकाणी अद्यापही विद्यार्थ्यांपर्यंत पुस्तके पोचली नाहीत आणि सदरची पुस्तके गुणांमध्ये पडून असतील तर संबंधित जबाबदार व्यक्तीवर कारवाई करून त्यांना तात्काळ निलंबित केले जाईल असा प्रकार जर कुठे घडला असेल तर त्याचे आपल्या कानावर घालावा. दुसरीकडे राज्यात धोकादायक शाळांबाबत आवश्यक ती खबरदारी घेतली जात आहे लवकर याबाबत योग्य तो निर्णय घेऊन.
ते पुढे म्हणाले जिल्ह्यातील रेंगाळलेला आंबोली गेळे कबुलायदार गावकर प्रश्नावरील स्टे उठला आहे त्यामुळे हा प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे याशिवाय चौकुळ गावचा प्रश्नही सुटण्यासाठी त्यांच्या ग्रामस्थांसोबत लवकरच बैठक घेतली जाणार आहे. मल्टीस्पेशालिटी बाबतही युद्ध पातळीवर हालचाली सुरू आहे त्यामुळे येत्या काही दिवसातच हा प्रश्नही उठणार आहे.
सिंधुदुर्गातील बस स्थानकापैकी सावंतवाडी बस स्थानकाचे काम गेले कित्येक वर्ष रखडले आहे त्यामुळे हे काम मार्गी लावण्यासाठी आपण पुढाकार घेतला आहे यामध्ये हे स्थानक बीओटी तत्वावर विकसित करा असे मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे केली आहे लवकरच याबाबत निर्णय होऊन हे कामही मार्गी लागणार आहे तर तिलारी येथील ॲमेझमेंट पार्क वेंगुर्ला येथील स्कुबा डायव्हिंग सबमरीन आधी प्रकल्प मार्गी लावण्यासाठी आपण प्रयत्नशील आहे. तर येत्या दोन महिन्यात सिंधुदुर्गातील पहिल्या फाईव्ह स्टार हॉटेलचे उद्घाटनही जिल्ह्यात पाहायला मिळेल.
