बांद्यात डॉ. शामाप्रसाद मुखर्जी पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

सरपंच प्रियांका नाईक यांनी प्रतिमेस अर्पण केला पुष्पहार

⚡बांदा ता.२५-: डॉ. शामाप्रसाद मुखर्जी यांच्या पुण्यतिथीनिमित्त भाजपा बांदा मंडल मध्ये बांदा सरपंच प्रियांका नाईक यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी अभिवादन करताना माजी बांदा जि. प. सदस्या श्वेता कोरगावकर म्हणाल्या की, डॉ. मुखर्जी यांनी जम्मू व काश्मीरच्या संपूर्ण विलीनीकरणासाठी अभियान सुरू केले. या आंदोलनानिमित्त प्रत्यक्ष काश्मीरमध्ये जाऊन प्रचार करण्याचा त्यांनी निश्चय केला. जम्मू-काश्मीरचे तत्कालिन मुख्यमंत्री शेख अब्दुल्ला यांच्या शासनाने त्यांच्या राज्यप्रवेशावर बंदी घातली. बंदी मोडून जम्मू-काश्मीरमध्ये प्रवेश केल्यावर त्यांना अटक झाली. तुरुंगवासातच त्यांचा अंत झाला. या प्रश्नावर शेख अब्दुल्ला यांच्याविरुद्ध त्यावेळी बरेच काहूर माजले होते.
प्रखर राष्ट्रवादी आणि भारतीय जन संघाचे संस्थापक असलेले डॉ. शामाप्रसाद मुखर्जी यांनी राष्ट्रीय ऐक्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली.
यावेळी बांदा मंडल अध्यक्ष महेश धुरी, सरचिटणीस मधुकर देसाई, उपाध्यक्ष सिद्धेश पावसकर, माजी सभापती शितल राऊळ, सरपंच प्रियांका नाईक, युवा जिल्हा उपाध्यक्ष जावेद खतीब, सिद्धेश महाजन, शैलेश केसरकर, संदीप बांदेकर, आबा धारगळकर, संतोष सावंत, सिद्धेश महाजन, बांदा बुथ अध्यक्ष रत्नाकर आगलावे, बुथ अध्यक्ष राकेश केसरकर, तनुजा वराडकर, श्रेया केसरकर आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page