अंकुश माजगावकर यांचा ८० वा वाढदिवस वाचनालयाच्या वतीने साजरा

⚡बांदा ता.२५-: बांदा शहरातील ऐतिहासिक नट वाचनालयात सामाजीक बांधिलकी जपणारे, बांदा गावावर प्रेम असणारे, समाजामध्ये वेगळा आदर्श निर्माण करणारे अंकुश माजगावकर यांचा ८० वा वाढदिवस वाचनालयाच्या वतीने साजरा करण्यात आला.
यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष एस. आर. सावंत, उपाध्यक्ष सुभाष मोर्ये, सचीव राकेश केसरकर, सहसचीव हेमंत मोर्ये, संचालक निलेश मोरजकर, जगन्नाथ सातोस्कर, शंकर नार्वेकर, सुधीर साटेलकर, संचालिका सौ. स्वप्नीता सावंत, ग्रथंपाल प्रमीला मोरजकर-नाईक, सौ. अमिता परब, वाचनालयाचे मार्गदर्शक प्रकाश पाणदरे आदी उपस्थित होते.
यावेळी अंकुश माजगावकर यानी वाचनालयास आठ हजार रूपयांची देणगी वाचनालयाचे अध्यक्ष श्री सावंत यांच्याकडे सुपूर्द केली. सुभाष मोर्ये यानी श्री माजगावकर यांच्याबद्दल गौरवोदगार काढले. शांत, संयमी व्यक्तीमत्व, बांदा गावावर प्रेम, या प्रेमातुन समाजाला आदर्श‌ बनवीणारे बांदा नट वाचनालयास त्याच्या कडून दरवेळी होणारी आर्थिक मदत, जेष्ठ नागरीक संघात कार्यरत असताना त्याचे होणारे समाज बांधीलकी जपणारे कार्य समाजाला एक वेगळा आदर्श देते, आम्हाला त्याचा अभिमान वाटतो.
राकेश केसरकर म्हणाले की, त्यांच्या यां कार्यातून आम्हा तरूणाना प्रेरणा मिळते. आज त्याच्या संस्कारातून त्यांची मुलगी श्रीमती प्रियांका नाईक बांदा गावची सरपंच बनली आहे.

You cannot copy content of this page