चिंदर अपघातातील बसचालकाची निर्दोष मुक्तता

वर्षभरापूर्वी कणकवली आचरा रस्त्यावर घडला अपघात : साक्षीदारांच्या साक्षीतील विसंगती

⚡मालवण ता.२५-: वर्षभरापूर्वी कणकवली आचरा रस्त्यावर चिंदर येथे एका चालत्या आरामबसच्या डिकीचा दरवाजा निखळून झालेल्या अपघातात दरवाजाची धडक बसून रिक्षेचे नुकसान तर काही ग्रामस्थांना दुखापत झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या बस चालक आनंद रवींद्र सकपाळ (वय ४१, रा. भांडुप) याची मालवण न्यायालयाने साक्षीदारांच्या साक्षीतील विसंगती व पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली आहे. बस चालकाच्या बाजूने ऍड. हेमेंद्र गोवेकर यांनी काम पाहिले.

सदर अपघात दि. २५ मे २०२२ रोजी रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास घडला होता. कणकवली ते आचरा मार्गावरून येणाऱ्या आराम बसच्या डिकीचा दरवाजा निखळून तो एका रिक्षावर आदळल्याने रिक्षाचे नुकसान झाले होते. तर त्याचवेळी रस्त्यावरील काही ग्रामस्थांना देखील या दरवाजाची धडक बसल्याने त्यांना दुखापत झाली होती. याप्रकरणी आचरा पोलीस ठाण्यात आराम बसचा चालक आनंद सकपाळ याच्या विरुद्ध हयगयीने व निष्काळजीपणे वाहन चालवून मानवी जीवितास धोका उत्पन्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्या प्रकरणी मालवण न्यायालयात सुनावणी होऊन यातील साक्षीदारांच्या जबाबातील विसंगती तसेच पुरव्यांचा अभाव यामुळे चालक आनंद सकपाळ याची मालवण न्यायालयाचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी महेश देवकते यांनी निर्दोष मुक्तता केली. चालक सकपाळ याच्यावतीने ऍड. हेमेंद्र गोवेकर यांनी काम पाहिले.

You cannot copy content of this page