दिविजा वृध्दाश्रमात आजी आजोबांनी साजरी केली आषाढी एकादशी
⚡कणकवली ता.०१-: असलदे येथील दिविजा वृध्दाश्रमात आषाढी एकादशी सर्व आजी आजोबांनी उत्साहात साजरी केली. यावेळी सर्व आजी आजोबांनी वारकरी आणि विठ्ठल-रखुमाईचे वेश परिधान करुन अक्षरश: पंढरी अवतरली. वारकरी संप्रदायाचा आनंदाचा उत्सव म्हणजे एकादशी. आणि या आजी आजोबाना पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जाता येणे अशक्य आहे. त्यामुळे दिविजा वृध्दश्रमाच्या व्यवस्थपनाने पंढरपूरच असलदे येथील दिविजा वृद्धाश्रमात अवतरले होते….
