कोकणातील जिल्हा बँकांनी एकत्रित येवून विकास साधूया

मुंबई बँक अध्यक्ष आ प्रवीण दरेकर;जिल्हा बँक वर्धापनदिन कार्यक्रमात केले आवाहन

ओरोस ता.०१-:

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या ४० व्या वर्धापन दिनानिमित्त कोकणातील सर्व जिल्हा बँकांचे अध्यक्ष एकाच व्यासपीठावर आले आहेत. या पाच जिल्ह्यांतील जिल्हा बँकांनी एकत्रित येवून ठरविले तर सरकार पेक्षा विकास करण्याची ताकद आहे. सहकाराची चळवळ कोकणात वाढली पाहिजे. यासाठी एकत्रित येवून फलोत्पादन, शेती, मत्स्य प्रक्रिया तसेच पर्यटन विकासाचा सहकाराच्या माध्यमातून आराखडा तयार करून शासनाला सादर करूया, असे प्रतिपादन विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते तथा मुंबई जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष आ प्रवीण दरेकर यांनी सिंधुदुर्गनगरी येथे बोलताना केले.


सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आज ४१ व्या वर्षात पदार्पण केले. यानिमित्त ४० व्या वर्धापनदिन कार्यक्रमाचे आयोजन सिंधुदुर्गनगरी येथील शरद कृषी भवन सभागृहात आ दरेकर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून रायगड जिल्हा सहकारी बँक अध्यक्ष आ जयंत पाटील, ठाणे जिल्हा सहकारी बँक अध्यक्ष राजेंद्र पाटील, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक दिलीप दिघे यांच्यासह आ नितेश राणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी, उपाध्यक्ष अतुल काळसेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे, भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली, संचालक व्हिक्टर डांटस, प्रकाश मोर्ये, आत्माराम ओटवणेकर, समीर सावंत, निता राणे, प्रज्ञा ढवण, रवींद्र मडगावकर, विद्यानंद परब, विठ्ठल देसाई, प्रकाश बोडस, गजानन गावडे, विद्याप्रसाद बांदेकर, मेघनाथ धुरी, माजी मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई, पी टी सावंत, श्रीकृष्ण मणेरिकर, जयवंत तावडे, माजी संचालक अजित गोगटे, माजी अध्यक्ष कृष्णनाथ तांडेल, आर टी मर्गज आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page