ग्लोबल महाराष्ट्र चैनलच्या वृत्ताची दखल : ग्रामस्थांमधून समाधान
⚡बांदा ता.०१-: न्हावेली-पाडलोस मार्गावरील मोरी पूल मुसळधार पावसामुळे खचले होते. ग्रामस्थांनी केलेल्या मागणीचा विचार करून सार्वजनिक बांधकाम विभागाने याची दखल घेतली. तात्काळ चारफुटी भगदाड दगडांच्या साहाय्याने बुजविले तर खचलेला भागही भरून काढला. त्यामुळे ग्रामस्थ, वाहनचालक व प्रवाशांमधून समाधान व्यक्त होत आहे.
गेले चार दिवस सुरू असलेल्या जोरदार पावसाचा फटका न्हावेली-पाडलोस रस्त्यावरील केणीवाडा येथे असलेल्या मोरी पुलाला बसला होता. पुलाच्या एका बाजूने चार फुटी भगदाड तर दुसऱ्या बाजूने भराव कोसळून पुल वाहतुकीस धोकादायक बनले होते. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने याची तात्काळ दखल घेऊन दुरुस्ती केली.
बांदा-शिरोडा मार्गावरील पाडलोस केणीवाडा येथे मोरीपुलाचे काम पूर्ण होऊन एक महिन्यांचा कालावधी उलटला. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच पुल खचल्याने बांधकाम विभागाच्या कारभारावर सर्वस्तरातून नाराजी व्यक्त करण्यात येत होती. मात्र प्रशासनाने वेळीच दखल घेतल्याने अनर्थ टळला असे ग्रामस्थांमधून सांगितले जात आहे.