⚡मालवण ता.२२-:
आमदार निलेश राणे यांच्या विकास कार्यावर प्रेरित होऊन गांव विकासाचा दृष्टिकोन ठेवून गोळवण परबवाडी येथील अनेक ग्रामस्थांनी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख मंदार लुडबे, शिवसेना शाखाप्रमुख विकास परब यांसह शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
गोळवण परबवाडी येथील सत्यवान चव्हाण, हेमंत परब, एकनाथ चव्हाण, विजय परब, प्रशांत परब, अनिल चव्हाण, राजन परब, गोविंद गोळवणकर, सुभाष परब, आनंद चव्हाण, विजय परब, वसंत गोळवणकर, वेदांत सावंत, शुभम चव्हाण, गौरव चव्हाण, गौरेश परब, बाळा परब, सुधाकर परब यांसह अनेक ग्रामस्थांनी शिवसेनेत प्रवेश केला. माजी वित्त व बांधकाम सभापती अनिल कांदळकर यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील विविध विकासकामांवर यावेळी सकारात्मक चर्चा झाली. अशी माहिती गोळवण शाखाप्रमुख विकास परब यांनी दिली.
