प्रांताधिकारी ई-पिक पाहणी नोंदणी जनजागृतीसाठी पोहचले शेतकऱ्यांच्या बांधावर

⚡कणकवली ता.०१-: खरीप हंगाम २०२३ साठी ई – पिक पाहणी नोंद शेतकऱ्यांनी करावी असे आवाहन थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जात कणकवली प्रांताधिकारी जगदीश कातकर यांनी केले आहे.

कणकवली तालुक्यातील हळवल ई-पीक पाहणी नोंदणी जनजागृतीसाठी महसूल विभागाच्या वतीने करण्यात आली.यावेळी हळवल येथील शेतकऱ्यांशी त्यांनी संवाद साधला.यावेळी महसूल विभाग मंडळ अधिकारी विलास चव्हाण,तलाठी मंगेश जाधव, तांत्रिक सहाय्यक बाजीराव काशिद, हळवल येथील शेतकरी,ग्रामस्थ उपस्थित होते.

खरीप हंगाम २०२३ पीक पाहणी नोंदणीसाठी ई – पीक पाहणीचे २.०.११ हे अपडेटेड व्हर्जन गूगल प्ले स्टोअर वर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. तरी सर्व खातेदार शेतकऱ्यांनी नवीन व्हर्जन अपडेट करून घेणे आवश्यक आहे. खरीप हंगामाच्या प्रत्यक्ष ई-पीक पाहणी मोबाईल ॲपद्वारे पीक पाहणी करण्यासाठी ०१ जुलै २०२३ पासून सुरु करण्यात येत आहे.
गेल्या १० वर्षात तलाठी केवळ १० टक्के पिक पाहणी करुन करायचे. बाकीची पिक पाहणी जशी असेल तशी ओढली जायची. बराच वेळा ती पिक पाहणी चुकीची असते. पिकांची योग्य नोंदणी झालेली नसल्यास मदत मिळताना अडचण येते.खरेदीखत करायच्या वेळेला आपण खरेदी विक्रीचे व्यवहार करतो,त्याच्यात नुकसान होते. तर बिनशेतीचा दर लागतो.त्यामूळे शेतकऱ्यांनी पिक पाहणी नोंद करुन शासनाला सहकार्य करावे,असे आवाहन श्री.कातकर यांनी केले. ई-पीक पाहणी मोबाईल ॲपच्या सहाय्याने सर्व खातेदार शेतकऱ्यानी तलाठ्याकडे न जाता स्वतःच्या मोबाईलवरून आपल्या ७/१२ वर विविध पिकांची नोंदणी करता येणे शक्य झाले आहे. महसूल विभागाचा ई-पीक पाहणी प्रकल्प १५ ऑगस्ट २०२१ पासून महाराष्ट्रात राज्यभर राबविण्यात येत आहे. या ॲपमध्ये आतापर्यंत सुमारे राज्यात १.८८ कोटीपेक्षा अधिक शेतकऱ्यानी रेजिस्ट्रेशन केलेले आहे व आपल्या पिकांची नोंदणी केली आहे. तरी शेतकऱ्यांनी खरीप हंगाम २०२३ साठी दिलेल्या कालावधीमध्ये आपली ई-पीक पाहणी नोंदणी पूर्ण करावी जेणे करून शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यास अडचण येणार नाही,असे आवाहन प्रांताधिकारी जगदीश कातकर यांनी केले आहे.

You cannot copy content of this page