स्वच्छ जल स्वच्छ मन उपक्रमांतर्गत कनकनगर ते केटी बंधारा परिसर स्वच्छ…

⚡कणकवली ता.२३-: संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन व कणकवली नगरपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने “स्वच्छ जल स्वच्छ मन” प्रोजेक्ट अमृत या उपक्रमाअंतर्गत शहरातील कनकनगर गणपती साना ते केटी बंधारा या परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

या मोहिमेत फाउंडेशनच्या सुमारे ८० सेवादलांनी सक्रिय सहभाग घेत संपूर्ण परिसर स्वच्छ केला. केटी बंधाऱ्यावरील नदीपात्रात साचलेला कचराही बाहेर काढण्यात आला. कनकनगर परिसरातील रहिवासीही या उपक्रमात सहभागी झाले होते. परिसर स्वच्छ झाल्यामुळे कनकनगर वासियांमधून समाधान व्यक्त करण्यात आले.

स्वच्छतेचा वसा कायम ठेवत परिसर स्वच्छ राखण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले. तसेच केटी बंधारा परिसरात मध्यपान व नशा करणाऱ्या व्यक्तींचा वावर आढळून येत असल्याने परिसर अस्वच्छ होत असल्याचे निदर्शनास आले. पुढे अशा प्रकारे कोणीही मध्यपान किंवा नशा करताना आढळल्यास कडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.

यावेळी संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनचे संयोजक विलास जाधव, संचालक महेश पांचाळ, कनकनगर वासी तसेच फाउंडेशनचे ८० स्वयंसेवक उपस्थित होते.

You cannot copy content of this page