⚡बांदा ता.०१-: कोकण कला व शिक्षण विकास संस्थेच्या माध्यमातून गेली ११ वर्षे सिंधुदुर्ग, रायगड ,नाशिक, पालघर, बीड, ठाणे , पुणे जिल्ह्यामध्ये सामाजिक , शैक्षणिक व आरोग्य विषयक विविध कार्यक्रम तसेच ग्रामीण भागातील महिलांना अर्थाजनाचे साधन निर्माण व्हावे यासाठी ग्रामपंचायतीच्या सहकार्याने विविध व्यावसायिक प्रशिक्षणे आयोजित केली जातात .
विविध सामाजिक कार्यक्रम करत असताना ज्या गरजू मुलांना शिकण्याची इच्छा आहे मात्र आर्थिक परिस्थिती कमकुवत आहे अशा शेकडो मुलांना कोकण संस्थेच्या वतीने शैक्षणिक साहित्य म्हणून दफ्तर व वह्या वाटप केले जाते. दिनांक ०१ जुलै २०२३ रोजी कुडाळ तालुक्यातील जि.प.पू.प्राथ. शाळा वेताळ बांबार्डे नं.१ या शाळेत शिकणाऱ्या १८ गरजू व हुशार मुलांना कोकण संस्थेच्या वतीने दफ्तर व वह्या वाटप करण्यात आल्या .
या शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमाच्या वेळी कोकण संस्थेचे समन्वयक श्री. समिर शिर्के यांनी उपस्थित मुलांना संस्थेच्या विविध उपक्रमांची माहिती दिली व विद्यार्थ्यांना शैक्षणिक वाटचालीस शुभेछ्या दिल्या .यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष डॉ. जे. के. घाडी, प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. शंकर गोसावी सर, सहाय्यक शिक्षक श्री. संदीप ठाकूर सर , श्रीम.समीक्षा परब मॅडम , श्रीम.सावली सुर्वे मॅडम, ग्रामपंचायत सदस्य श्री. नाईक व शाळेचे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.
शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष डॉ. जे. के. घाडी यांनी कोकण संस्थेचे आभार मानले व संस्थेच्या पुढील उपक्रमांना शुभेच्छा दिल्या.