⚡कणकवली ता.०१-: तेली समाज उन्नती मंडळाची सन २०२३ ची वार्षिक सर्वसाधारण सभा व गुणगौरव समारंभ रविवार २३ जुलै २०२३ रोजी सकाळी १०.३० वा. वृंदावन हॉल कलमठ, (जानवली पुलाजवळ) येथे आयोजित केला आहे.
यावेळी गुणवत्ताप्राप्त विद्यार्थी व समाज बांधवांचा सत्कार करण्यात येणार आहे. सन २०२३ च्या दहावीच्या परीक्षेत ९० टक्के व त्यापेक्षा जास्त, १२ वी परीक्षेत ८० टक्के व त्यापेक्षा जास्त, पदवी व पदव्युत्तर परीक्षेत प्रथम श्रेणी प्राप्त केलेले विद्यार्थी व शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांनी आपल्या गुणपत्रिकेची झेरॉक्स प्रत जिल्हा सचिवांजवळ पाठवावी. आर्थिक मदतीसाठीचे अर्ज तालुका मंडळामार्फत पाठवावेत. सदर माहिती १० जुलै २०२३ पर्यंत पाठवावी.असे आवाहन करण्यात आले आहे.