⚡कणकवली ता.०१-: असलदे येथील दिविजा वृध्दाश्रमात आषाढी एकादशी सर्व आजी आजोबांनी उत्साहात साजरी केली. यावेळी सर्व आजी आजोबांनी वारकरी आणि विठ्ठल-रखुमाईचे वेश परिधान करुन अक्षरश: पंढरी अवतरली.
वारकरी संप्रदायाचा आनंदाचा उत्सव म्हणजे एकादशी. आणि या आजी आजोबाना पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जाता येणे अशक्य आहे. त्यामुळे दिविजा वृध्दश्रमाच्या व्यवस्थपनाने पंढरपूरच असलदे येथील दिविजा वृद्धाश्रमात अवतरले होते. चक्क आजी आजोबांनी विठ्ठल रखुमाईच्या वेषात आले. सर्व सहकार्यानी पावसाची जोरदार बॅटिंग चालू असतानाच लेझीम टाळ सह असलदे परिसरात दिंडी काढली.
विविध सांस्कृतिक कार्यक्रम नृत्यासह साजरे झाले. डोक्यावर तुळशी, कलश, पालखी या सर्वांचा समावेश होता. या दिंडीला मुख्याध्यापक श्री व सौं हादगे, इंजिनियर श्री पडवळ, स्वस्तिक फाउंडेशन चे सेक्रेटरी संदेश शेट्ये, खजिनदार अविनाश फाटक व सौं मैथिली फाटक व सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.