वैभववाडीत २२ रोजी मतदान नोंदणी शिबिराचे आयोजन…

⚡वैभववाडी ता.१८-: नव मतदार नोंदणी शिबीराचे आयोजन सोमवार दि.22 जुलै रोजी मतदार स.10.30 वाजता आनंदीबाई रावराणे महाविद्यालय वैभववाडी येथे तहसिलदार सुर्यकांत पाटील वैभववाडी यांच्या प्रमुख उपस्थितीत ,“नव मतदार नोंदणीशिबिराचे आयोजन करण्यात आले आहे .या शिबिरास आपण सर्वांनीच उपस्थित राहून वैभववाडी तालुक्यात मोठ्या प्रमाणात नवमतदार नोंदणी करून सहकार्य कराव आवाहनप्रमोद रावराणे भाजप जिल्हा उपाध्यक्ष तथा सचिव…

Read More

माणगाव येथे निष्ठा यात्रेचा मोठ्या उत्साहात शुभारंभ…

आमदार वैभव नाईक यांचे नेतृत्व: निष्ठा यात्रेला उस्फुर्त प्रतिसाद कुडाळ ता.१८-: उद्धव ठाकरे यांना पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करण्यासाठी शिवसेनेच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक गावात निष्ठा यात्रा काढण्यात येणार आहे. आज गुरुवारी या निष्ठा यात्रेचा शुभारंभ आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली माणगाव येथे करण्यात आला. प्रथमतः माणगाव येथील श्री दत्तमंदिर टेंबेस्वामी मठ येथे दर्शन…

Read More

लोप पावलेली नाट्यकला जिवंत ठेवण्यासाठी लवकरच नाट्यमहोत्सवाचे आयोजन…

अँड सिद्धेश माणगावकर:देवगड युथ फोरम संस्थेच्या वतीने केले जाणार आयोजन.. ⚡देवगड-: युथ फोरम देवगड संस्थेच्या माध्यमातून देवगड मध्ये काळानुरुप लुप्त झालेली नाट्य कला पुन्हा जिवंत करण्यासाठी लवकरच नाट्य महोत्सवाचे आयोजन करणार असल्याचे प्रतिपादन देवगड युथ फोरम संस्थेचे अध्यक्ष अँड सिद्धेश माणगावकर यांनी केले. उपाध्यक्ष प्रणव नलावडे, सचिव अमीत पारकर, खजिनदार सागर गावकर, सहसचिव प्रथमेश माणगांवकर,…

Read More

राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेसाठी जिल्ह्याच्या संघाची निवड…

कणकवली येथील स्पर्धेला खेळाडूंचा प्रतिसाद… ⚡कणकवली ता.१८-: तायक्वांदो असोसिएशन ऑफ सिंधुदुर्गच्या मान्यतेने कणकवली तालुका अम्यॅच्युअर तायक्वांदो असोसिएशनच्यावतीने जिल्हास्तरीय कॅडेट व ज्युनिअर तायक्वांदो स्पर्धा येथील नगरवाचनालयाच्या सभागृहात झाली. या स्पर्धेतील प्रथम क्रमांक प्राप्त खेळाडूंची राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेसाठीच्या जिल्ह्याच्या संघात निवड झाली आहे. या स्पर्धेचे उदघाट्न विद्यामंदिर हायस्कूलचे क्रीडा शिक्षक अच्युतराव वणवे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी…

Read More

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची उद्या ४१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा…

⚡ओरोस ता १८-: सिंधूदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची ४१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज शुक्रवार, दि. १९ जुलै २०२४ रोजी दुपारी १२ वाजता सिंधुदुर्गनगरी येथील शरद कृषी भवन येथे आयोजित करण्यात आली आहे.सिंधुदुर्ग जिल्हा बँकेने १ जुलै २०२४ रोजी ४१ वर्ष पुर्ण करुन ४२ व्या वर्षात पदार्पण केले आहे. बँकेने काळानुरुप आवश्यक ते बदल आत्मसात…

Read More

आंदोलन करणाऱ्या डी एड बेरोजगारांना धोका पोहोचल्यास शिक्षणमंत्री जबाबदार…

अमित सामंत:सिंधुदुर्गनगरी येथील आंदोलनाला भेट देत दिला पाठिंबा.. सिंधुदुर्गनगरी ता १८-:जिल्ह्यात शेकडो उमेदवार डी एड पदविका घेऊन बेरोजगार आहेत. त्यांना न्याय देण्यासाठी शिक्षण मंत्री अपयशी ठरले आहेत त्यांनी मनात घेतले तर हा प्रश्न मार्गी लागु शकतो.परन्तु ते मनावर घेत नाहीत हीच मोठी समस्या आहे असे यावेळी अमित सामंत यांनी स्पस्ट केले.दरम्यान प्राथमिक शिक्षणाधिकारी गणपती कमळकर…

Read More

असलदे येथील इसम बेपत्ता…

कणकवली;कणकवली तालुक्यातील असलदे दिवानसानेवाडी येथील शेतकरी धाकू लक्ष्मण मयेकर ( वय ७८ वर्षे ) हे १७ जुलै रोजी सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास शेतीच्या कामासाठी शेतात गेले असताना अद्यापही परतले नाहीत. दरम्यान त्यांची छत्री शेती लगत असलेल्या पियाळी नदीकाठी आढळून आल्याने पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची भिती स्थानिकांनी व्यक्त केली आहे. याबाबत कणकवली तहसिलदार दीक्षांत देशपांडे घटनास्थळी…

Read More

युवा रक्तदाता संघटना आयोजित ‘रक्तदान शिबीरा’ला उत्स्फूर्त प्रतिसाद…

मंत्री दीपक केसरकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य: तब्बल ५० रक्तदात्यांनी केल रक्तदान.. ⚡सावंतवाडी ता.१८-: राज्याचे शालेय शिक्षणमंत्री, आमदार दीपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त युवा रक्तदाता संघटनेकडून ‘रक्तदान शिबीरा’चं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिरात तब्बल ५० रक्तदात्यांनी रक्तदान करत पवित्र असं दान केलं. उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडीच्या रक्तपेढीत हे शिबीर संपन्न झालं. यावेळी मंत्री दीपक केसरकर यांनी ऑनलाईन…

Read More

पावसाने घर कोसळलेल्या वेंगुर्लेमधील गरीब विधवा मच्छिमार महिलेला भाजपाचा मदतीचा हात…

भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी आर्थिक योगदान देत उचलला वाटा.. ⚡वेंगुर्ला ता.१८-: संततधार कोसळणाऱ्या पावसाने वेंगुर्ले नवाबाग भागातील विद्या दत्ताराम आरोंदेकर या गरीब मच्छिमार महिलेचे घर कोसळल्याने कुटुंबासमोर निवाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला. शासकीय प्रक्रियेतून मदत मिळेपर्यंत तातडीने तात्पुरत्या स्वरूपात निवाऱ्यासाठी डागडुजी करणे गरजेचे होते. भाजपाचे वेंगुर्ले तालुक्याचे माजी तालुकाध्यक्ष आणि विद्यमान जिल्हा पदाधिकारी प्रसन्ना…

Read More

ओरोस-ख्रिश्चनवाडीतील नुकसानग्रस्तना ‘मिशन आधार’चा मदतीचा हात…

‘मिशन स्थिरता’ अंतर्गत केली अन्नधान्याची मदत ⚡कुडाळ ता.१८-: अलीकडेच झालेल्या अतिवृष्टीमुळे सर्वस्व गमावलेल्या ओरोस-ख्रिश्चनवाडीतील नागरिकांना मिशन आधारने मदतीचा हात दिला. त्या पूरग्रस्त कुटुंबियांना ‘मिशन स्थिरता’ अंतर्गत अन्नधान्य आणि इतर मदत करण्यात आली.7 जुलै रोजी पडलेल्या पावसाने कुडाळ तालुक्यात लोकांचे फार मोठे नुकसान झाले. मुंबई गोवा महामार्ग तब्बल 14 तास बंद होता. पावशी, हुमरमळा, वेतळबाबर्डे,ओरोस येथे…

Read More
You cannot copy content of this page