विज्ञान शाखेत असलेल्या संधीचा फायदा घेत संधीचे सोने करा-:संतोष मयेकर…

मालवण दि प्रतिनिधी
सध्याच्या काळात संघर्ष हा पावला पावलावर आहे आणि त्यातून तुम्हालाच मार्ग काढायचा आहे. त्यामुळे कष्ट करण्यास मागे हटू नका, नेहमी पुढे जाण्याचा प्रयत्न करा, विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना सध्या अनेक क्षेत्रात संधी आहेत त्याचे सोने विद्यार्थ्यांनी केले पाहिजे, असे प्रतिपादन मालवण येथील भंडारी हायस्कुलचे माजी विद्यार्थी व नैरोबी या देशात चीफ इंजिनिअर म्हणून कार्यरत असलेले संतोष मयेकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना केले.

मालवण येथील भंडारी हायस्कूलचे एसएससी १९९० च्या बॅचचे माजी विद्यार्थी आणि नैरोबी या देशात चीफ इंजिनिअर म्हणून कार्यरत असलेले संतोष मयेकर यांनी भंडारी हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या अकरावी बारावीच्या विज्ञान शाखेच्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे चेअरमन सुधीर हरेकर, मुख्याध्यापक श्री. एच बी तिवले, लोकल कमिटीचे सेक्रेटरी दशरथ कवटकर, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री. भुपेश गोसावी आदी उपस्थित होते. मार्गदर्शन कार्यक्रमात मयेकर यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

या दरम्यान, संतोष मयेकर यांनी शाळेची पाहणी केली तसेच संतोष मयेकर आणि त्यांच्या बॅचच्या अन्य माजी विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे भंडारी हायस्कूलला दिलेल्या डिजिटल प्रोजेक्टरची देखील पाहणी केली. भंडारी हायस्कूलमध्ये सुरू असलेले अन्य उपक्रमांची पाहणी संतोष मयेकर यांनी करत आनंद व्यक्त केला. यावेळी सौ हर्षलता मयेकर यांचा देखील आदर सौ वाक्कर मॅडम यांच्या हस्ते करण्यात आला

You cannot copy content of this page