Headlines

ज्येष्ठ नागरिक विकास मंचाच्या त्रैवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

२०२६ ते २०२९ या कालावधीसाठी कार्यकारी मंडळाची निवडणूक

बांदा/प्रतिनिधी
ज्येष्ठ नागरिक विकास मंच, बांदा पंचक्रोशी या संस्थेच्या २०२६ ते २०२९ या तीन वर्षांच्या कालावधीसाठी कार्यकारी मंडळाच्या त्रैवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. संस्थेच्या सभासदांना या निवडणूक कार्यक्रमाची माहिती व्हावी, यासाठी संस्थेच्या वतीने तो विविध ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आला आहे.
ज्येष्ठ नागरिक विकास मंच ही संस्था गेल्या दशकभरापासून बांदा पंचक्रोशी परिसरात कार्यरत आहे. संस्थेच्या काळसेवाडी, बांदा येथील कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर तसेच ग्रामसचिवालय, बांदा आणि संस्थेच्या विरंगुळा केंद्राच्या नोटीस बोर्डावर निवडणूक कार्यक्रम प्रसिद्ध करण्यात आला आहे.
संस्थेच्या सभासदांनी प्रसिद्ध केलेल्या निवडणूक कार्यक्रमाची नोंद घ्यावी, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page